Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाग्यनगर पोलिसांची मोठी कारवाई; 10घरफोड्या उघड – 78 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत चार चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या मार्फत तब्बल 10घरफोडीचे गुन्हे उघडक

संशयित दानिश शेखच्या फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक
पुण्यात चक्क बस चोरून सुसाट पळवली
महिला पोलिस अधिकार्‍याला 28 लाखांची लाच घेताना अटक

नांदेड : भाग्यनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने प्रभावी कारवाई करत चार चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या मार्फत तब्बल 10घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. न्यायालयाने या चार आरोपींना  23एप्रिल 2026 पर्यंत दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 78 लाख 35 हजार  60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 44.5 तोळे सोन्याचे दागिने, 171.4 तोळे चांदीचे दागिने, एक मारुती कार आणि तीन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक संतोष तांबे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, नरेश वाडेवाले यांच्यासह पथकातील अधिकार्‍यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणात सोहेल अब्दुल सत्तार (19), प्रदीपकुमार कौरी (19), अर्जुन मोरे (28), शेख नईम (22) आणि आशा तेलंग (56) यांना ताब्यात घेण्यात आले असून एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचाही सहभाग आढळून आला आहे. त्यापैकी बालक वगळता इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात उघड झाले की, सोहेल, प्रदीप आणि विधीसंघर्षग्रस्त बालक हे प्रत्यक्ष घरफोड्या करत होते, तर इतर आरोपी चोरीचा माल विकणे व गुन्ह्याची तयारी करण्यात मदत करत होते. या टोळीने भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6, शिवाजीनगरमध्ये 2 आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 अशा एकूण 10 घरफोड्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS