मुदखेड : पारदर्शक आणि कार्यकर्तामैत्री पूर्ण निवड प्रक्रिया राबवून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यावर भर दिला जाणार असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्

मुदखेड : पारदर्शक आणि कार्यकर्तामैत्री पूर्ण निवड प्रक्रिया राबवून काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यावर भर दिला जाणार असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्यासाठी ’संघटन सृजन’ हे विशेष अभियान राबविले जात आहे.लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देश पातळीवर काँग्रेस पक्षाला मजबूत करत पक्ष संघटन बळकटीकरण करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सूचनेनुसारच पक्ष संघटन सृजन अभियान राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे निरीक्षक हरकाला वेणुगोपाल यांनी केले ते दि.19 एप्रिल रोजी मुदखेड येथील ’संघटन सृजन’विशेष बैठकीत बोलत होते.
यावेळी प्रदेश सचिव अमरनाथ खानापूरकर,कार्याध्यक्ष तिरुपती कोंडेकर,सुरेश तिवारी, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे,भोकर तालुका अध्यक्ष बाबा गौड,अर्धापूर तालुका अध्यक्ष सुनील वानखेडे,मुदखेड काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख,माजी नगराध्यक्ष राजबहादुर कोत्तावार यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना हरकाला वेणुगोपाल म्हणाले सर्वच पदाधिकारी,विशेषतः जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांच्या निवडी या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून तसेच त्यांच्या शिफारशीच्या आधारेच केल्या जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. भोकर काँग्रेसचे अध्यक्ष तोसिफ इनामदार,करीम खान साहब,मुजीब पठाण,गंगाधर डांगे,गोविंद गोपणपल्ले,सूर्यकांत चौदंते,गिरीश कोत्तावार,विश्वनाथ पवार,अविनाश चौदंते,मोहम्मद खदीर खाजा मिया,संजय बोकेफोड,गंगाधर खतगावे,अतीख अहेमद,खदीर खुरेशी, रमेश बोडके,सुरेश ढगे,शिवानंद देवके,सुभाष चौदंते,विठ्ठल आचार्य,गजानन संबोड,प्रशांत पाटील मुंगल,वेदांत शेवटे,मो अनीस,यांच्यासह भोकर विधानसभेतील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे यांनी केले.
शहराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
मुदखेड शहराध्यक्ष पदाची निवड देखील संघटन सृजन या अभियानांतर्गत होणार आहे, शहराध्यक्ष पदासाठी गिरीश कोत्तावार माजी नगरसेवक गंगाधर डांगे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत परंतु काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कैलास गोडसे यांनी पक्षनिरीक्षक हरकला वेणुगोपाल यांची भेट घेतली असून पक्षाकडे शहराध्यक्ष पदासाठी आपली दावेदारी असल्याचे अधोरेखित केले आहे.या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख,यांच्यासह काही नगरसेवकांचाही समावेश होता.पक्ष बांधणीसाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज असल्याचे यावेळी वेणुगोपाल राव यांनी कैलास गोडसे यांना सांगितले.

COMMENTS