बीड : दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात योग्य दिशा मिळावी आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देश

बीड : दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात योग्य दिशा मिळावी आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतन, बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत अचूक व सुसंगत मार्गदर्शन मिळणार आहे.
या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती, ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत, प्राधान्यक्रमानुसार महाविद्यालय व शाखा निवड, कागदपत्र पडताळणी तसेच प्रवेशाशी संबंधित सर्व टप्प्यांवर सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही माहिती दिली जाणार असून विद्यार्थ्यांची धावपळ व गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, क्षमता आणि भविष्यातील संधी लक्षात घेऊन योग्य शाखा निवडीसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाईल. प्राचार्य डॉ. बापुराव गहिनीनाथराव मरलापल्ले यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ ट्रेंड पाहून नव्हे, तर आपल्या कौशल्यांनुसार शाखा निवडणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थी सक्षम तंत्रज्ञ म्हणून घडू शकतात. या केंद्राचा लाभ घेतल्यास करिअरचा मार्ग अधिक सुकर होईल. महाविद्यालयाच्या वैशिष्ट्यांमध्ये अद्ययावत प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, डिजिटल क्लासरूम्स, ई-लर्निंग सुविधा आणि समृद्ध ग्रंथालय यांचा समावेश आहे. तसेच उद्योगसंलग्न प्रशिक्षण, तांत्रिक कार्यशाळा, सेमिनार, इंडस्ट्रियल व्हिजिट्स आणि प्लेसमेंट मार्गदर्शनावर विशेष भर दिला जातो. महाविद्यालयात ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल (खखउ)’ कार्यरत असून नवोपक्रम, उद्योजकता व संशोधनवृत्तीला चालना दिली जाते. सुरक्षित व आधुनिक कॅम्पस, फायर सेफ्टीसारख्या सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण ही महाविद्यालयाची वैशिष्ट्ये असून ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत हजारो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शन केंद्रात अनुभवी प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध राहणार असून इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

COMMENTS