श्रीगोंदा : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, चारित्र्य आणि सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने शारदा विद्या निकेतन, श्रीगोंदा येथे ‘शारदा मूल्यशिक्षणांकित संस्कार शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. भूषण महापुरुष यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची जपणूक करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शिबिरामध्ये मनोरंजनातून शिक्षण, संस्कारांची रुजवणूक, आध्यात्मिक व मानसिक विकास, चारित्र्य निर्माण तसेच शिस्त व आत्मविश्वास वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. खेळ, कथा, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण दिले जाणार असून, महापुरुषांच्या विचारांद्वारे राष्ट्रप्रेमाची जाणीवही करून दिली जाणार आहे. या उपक्रमाचे आयोजन शारदा विद्या निकेतनच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष प्रा. दीपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथराव आळेकर, तसेच सचिव डॉ. अशोक खंडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असून नोंदणीची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२६ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ह.भ.प. विठ्ठल खेडकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
श्रीगोंदा : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, चारित्र्य आणि सर्वांगीण विकास घडविण्याच्या उद्देशाने शारदा विद्या निकेतन, श्रीगोंदा येथे ‘शारदा मूल्यशिक्षणांकित संस्कार शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर शुक्रवार दि. १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. भूषण महापुरुष यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची जपणूक करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
शिबिरामध्ये मनोरंजनातून शिक्षण, संस्कारांची रुजवणूक, आध्यात्मिक व मानसिक विकास, चारित्र्य निर्माण तसेच शिस्त व आत्मविश्वास वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. खेळ, कथा, विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण दिले जाणार असून, महापुरुषांच्या विचारांद्वारे राष्ट्रप्रेमाची जाणीवही करून दिली जाणार आहे. या उपक्रमाचे आयोजन शारदा विद्या निकेतनच्या वतीने करण्यात आले असून अध्यक्ष प्रा. दीपक होनराव, उपाध्यक्ष एकनाथराव आळेकर, तसेच सचिव डॉ. अशोक खंडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
शिबिरासाठी प्रवेश मर्यादित असून नोंदणीची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२६ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ह.भ.प. विठ्ठल खेडकर यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.

COMMENTS