बीड : महात्मा बसवेश्वर यांनी 12 व्या शतकात जातीभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याची दखल आजही जग घेत आहे. अशा महापुरुषां

बीड : महात्मा बसवेश्वर यांनी 12 व्या शतकात जातीभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याची दखल आजही जग घेत आहे. अशा महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सवानिमित्त ते बोलत होते. यावेळी समाजातील विविध मान्यवर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याला डॉ.योगेश क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा, नगरसेवक शुभम धूत, बबनराव गोरे, राजेंद्र बनसोडे, निवासी जिल्हाधिकारी (विभागीय) शिवकुमार स्वामी, नगरसेवक राकेश जाधव, राणा चव्हाण यांच्यासह वीरशैव समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाही आणि समतेची पायाभरणी केली. सामाजिक एकता निर्माण करून समाजात पसरलेली अंधश्रद्धा, विषमता आणि जातीच्या भिंती तोडून सर्वांनी एक समाज म्हणून एकत्र येणे आणि विकास साधणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. स्त्रियांना मानाचे स्थान मिळावे, हे बसवेश्वरांच्या कार्याचे प्रमुख सूत्र होते. आजही महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. या जयंती निमित्त आयोजित या सोहळ्यात वीरशैव लिंगायत समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात हा जयंती उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमास शिवाप्पा भुरे, अशोक शहागडकर, अशोक आप्पा पाटील, अनिल मिटकरी, बाळू मिटकरी, उत्तरेश्वर आप्पा कानडे, कुंभेश्वर विभुते, संदीप शेटे, राजेंद्र राजमाने, बंडू शेटे, पंकज पायगुडे, अनंत शहागडकर, दिलीप ढेपे, सचिन परंडकर, चंद्रकांत कानडे, अमर ढेपे, अमोल होनराव, गणेश स्वामी, अमर शेटे, सतीश आप्पा नगरे, सचिन आप्पा शहागडकर, उत्तरेश्वर स्वामी काळेगावकर, गुरुलिंग आप्पा बेदरकर, आंधळकर आप्पा, महेश शेटे, सिद्धेश्वर शहागडकर, संजय घाळे, विलास आप्पा, रवींद्र स्वामी बेदरकर, सचिन रेगुडे, पशुपती मिटकरी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS