Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. संजय दवंगे यांना शब्दगंधचा ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष’ पुरस्कार

कोपरगाव ः शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात शब्दगंध परिषदेच्या वतीने शैक्षणि

गुहात आमदार अबू आझमींना गावकर्‍यांचा विरोध
माजी नगरसेवक शिवद्रोही छिंदमकडून एकास जातीवाचक शिवीगाळ
gevrai : पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप l LokNews24

कोपरगाव ः शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात शब्दगंध परिषदेच्या वतीने शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल डॉ. संजय भाऊसाहेब दवंगे (कार्याध्यक्ष, शाखा कोपरगांव) यांना ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार : 2023’ देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले.
या संमेलनात कोपरगाव शाखेचे कार्याध्यक्ष व के.जे.सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. संजय दवंगे यांना ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी मागील काही वर्षापासून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सर्वाधिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संमेलनाचे स्वागताध्यक्ष व अहमदनगर शहराचे विद्यमान आमदार संग्रामभैया जगताप, 15 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. पुरूषोत्तम भापकर, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. डॉ. संजय दवंगे यांना यापूर्वी शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार प्राप्त झालेला असून सध्या ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य आहे. नुकताच त्यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेचा ’उत्कृष्ट कार्याध्यक्ष पुरस्कार’ मिळाल्याने महाविद्यालयाच्या गुणगौरवात भर पडली आहे. डॉ. संजय दवंगे यांनी पुरस्काराच्या रूपाने मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी व के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, विश्‍वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS