Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्यात ठप्प झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत

मुंबई : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक बाजार समितीत कांद्याचे भाव ८ ते १३ रुपयांपर्यं

कांद्याला ३००० रुपये हमीभाव द्या किसान सभेची मागणी; सरकारने अंत पाहू नये! डॉ. अजित नवले आक्रमक
चांदवडमध्ये कांदा उत्पादकांचा महाभडका; रोहित पवार,अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ पोलिसांच्या ताब्यात
कांदा प्रश्नी महाराष्ट्रात शेतकरी पेटला! संतप्त शेतकऱ्यांचा मुंबई-आग्रा हायवेवर ‘रास्ता रोको’
Big Decision for Onion Farmers : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची  मोठी घोषणा; २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय

मुंबई : मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक बाजार समितीत कांद्याचे भाव ८ ते १३ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी आणि निर्यातदार व्यापारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
चाकण बाजारात रविवारी (ता. १९) १२ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. मात्र, आखाती देशांतील मागणी घटल्याने देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढून दरात मोठी घसरण झाली आहे. बियाणे, खते आणि मजुरीचा खर्च वाढलेला असताना मिळणारा भाव अत्यल्प असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. साठवणुकीच्या सोयींअभावी कांदा खराब होत असल्याची भीती  शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आखाती देशांत होणारी निर्यात थांबल्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. सरकारने तातडीने हमीभाव किंवा अनुदान देऊन निर्यात धोरणात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी संघटनांनी सरकारने याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून निर्यात पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.

COMMENTS