Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी समाजासाठी सदैव लढणार : मंत्री भुजबळ  

जामखेड  : “ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी मी सदैव लढत आलो आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. तळागाळातील समाजाच्या अडचणी समजून घेत त्यावर ठोस उपाययो

आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवा : आ.विवेक कोल्हे;  नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना  
बसस्थानक उभारणीत नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष; आ. आशुतोष काळे ; काँक्रिटीकरण कामास प्रारंभ 
कवी, लेखक, लोककलावंत हे समाजभक्ती व नीतीशक्ती वाढविणारे घटक; डॉ. बाबुराव उपाध्ये : श्रीरामपुरात लोककला कलावंत साहित्यिक परिषदेचे कविसंमेलन उत्साहात

जामखेड  : “ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी मी सदैव लढत आलो आहे आणि पुढेही लढत राहणार आहे. तळागाळातील समाजाच्या अडचणी समजून घेत त्यावर ठोस उपाययोजना करणे ही आपली जबाबदारी आहे. संघटनेची बांधणी मजबूत केल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजूट ठेवून काम करावे.”असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छनग भुजबळ यांनी आवाहन केले.  जामखेड येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आले होते यावेळी  महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जामखेड शहरात त्यांचे त्साहपूर्ण व जंगी स्वागत करण्यात आले.
शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी, फलक आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.  “ओबीसी समाजाचा विजय असो”, “छगन भुजबळ आगे बढो” अशा घोषणांनी परिसर गजबजून गेला. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
ते पुढे म्हणाले की, “समाजकारण करताना सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामाजिक ऐक्य आणि समता यावर भर देत काम केल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. तरुणांनी पुढे येऊन नेतृत्व स्वीकारावे आणि समाजाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावे.”
या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन म्हेत्रे, तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, शहराध्यक्ष राजू शेलार, कार्यकारिणी सदस्य महेश थोरात, प्रवक्ते डॉ. नागेश गवळी, आरिफ सय्यद, शरद म्हेत्रे, अन्सार सय्यद, माऊली राळेभात, अजिंक्य यादव, संजय बेलेकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS