अहिल्यानगर : कोल्हार जवळील गर्भगिरी डोंगरास आग लागून सुमारे एक हजार क्षेत्रातील झाडे-झुडपे जळून खाक झाले. जंगलातील वन्यप्राणी, पशु, पक्षी या आगी

अहिल्यानगर : कोल्हार जवळील गर्भगिरी डोंगरास आग लागून सुमारे एक हजार क्षेत्रातील झाडे-झुडपे जळून खाक झाले. जंगलातील वन्यप्राणी, पशु, पक्षी या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. दरवर्षी या वनाला जाळरेषा केली जाते मात्र यावर्षी वनविभागाने जाळरेषा केली नव्हती. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
पाथर्डी तालुक्यात कोल्हार व कोल्हार परिसरामध्ये वन विभागाचे २००० एकरमध्ये वन क्षेत्र आहे. दरवर्षी या विभागामध्ये नवनवीन वृक्ष लागवड केली जाते. परंतु त्याचे योग्य संगोपन केलं जात नाही. दरवर्षी जाळरेषा करावयास हवी, ती यावर्षी न केल्यामुळे एका ठिकाणी लागलेली आग पूर्ण वनपरिक्षेत्रात पोहोचली.
या आगीत हजारो नवीन लाव लेले झाडे, जमिनीवर सरपटणारे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडले. वेळोवेळी जाळ रेषा करण्यासंदर्भात ग्रामस्थांनी व परिसरातील नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. परंतु याकडे वन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी सभापती संभाजीराव पालवे यांनी केला.
हजारो एकरातील वनसंपदा, सरपटणारे प्राणी खाक झाले. याविषयी नेमकी कोणाकडे दाद मागायची हा खरा प्रश्न आता सामान्य जनतेला पडलेला आहे. वनविभागाकडून दरवर्षी तिथे झाड लावण्याचा फार्स केला जातो. प्रत्यक्ष कृती काहीच केली जात नाही. जर वेळीच जाळरेषा मारल्या असत्या तर आज हजार एकरातील जंगल नष्ट झालं नसते. या घटनेस वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी जबाबदार आहेत.
वनविभागाकडे सगळी साधनसामग्री, मनुष्यबळ आहे. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्यासाठी तुमच्याकडे पैसा असतो. बोगस पाणी देण्यासाठी सुद्धा पैसा असतो पण तेच झाड सहा महिन्यानंतर जळून खाक होते. याच्यासाठी निधी नसेल तर दुर्देवाची गोष्ट आहे. अशी खंत व्यक्त करुन या घटनेची चौकशी करावी, अशी मागणी माजी सभापती संभाजीराव पालवे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

COMMENTS