Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!

गेवराई : फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेचा निकाल दि. 15 एप्रिल रोजी जाहीर झाला. या नि

लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलचा 100% निकाल; 10 वी सीबीएसई परीक्षेत विद्यार्थ्यांची गौरवशाली कामगिरी
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल
संजीवनी इंटरनॅशनल स्कूलचा १०० टक्के निकाल  

गेवराई : फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेचा निकाल दि. 15 एप्रिल रोजी जाहीर झाला. या निकालात शिव शारदा पब्लिक स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत गेवराई तालुक्यातील सीबीएसई शाळांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर, गढी येथील सीबीएसई माध्यमाच्या शिव शारदा पब्लिक स्कूलचा शैक्षणिक वर्ष 2025-26 चा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेत कु. आंधळे अथर्व राजू याने 95.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. शेलकर स्वरा सतीश हिने 95.40 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. इघे कीर्ती संतोष हिने 95 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. तसेच कु. पुरणपोळे अदिती संजय हिने 94.80 टक्के आणि कु. दाभाडे शिवम विलास याने 94.60 टक्के गुण मिळवत अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक मिळवला. या बॅचमध्ये एकूण 116 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 50 टक्के विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले, तर 16 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत विशेष प्राविण्य संपादन केले. शाळेचा एकूण निकाल 100 टक्के लागला असून बीड जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करत शाळेने विशेष ठसा उमटवला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शिवाजीराव पंडित, मा. अमरसिंह पंडित, सचिव जयसिंग पंडित, आमदार विजयसिंह पंडित, शारदा क्रीडा अकादमीचे संचालक युवा रणवीर पंडित, युवा नेते पृथ्वीराज पंडित तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. विशाल भारद्वाज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच माजी प्राचार्य संतोष कुमार अन्नम यांनाही प्राचार्य डॉ. विशाल भारद्वाज यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

COMMENTS