Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’रक्ताचा रंग एकच’ : पालीत भीम जयंतीनिमित्त सामाजिक एकतेचे प्रेरणादायी दर्शन

पाली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाली येथील नालंदा बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान

संविधानातील मूल्ये तळागाळापर्यंत रुजविणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन – मेघना कावली
मिरजगावात डॉ. आंबेडकर यांना महामानवंदना
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे

पाली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पाली येथील नालंदा बुद्ध विहार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात तब्बल 51 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मानवतेचा संदेश दिला.
या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे अनोखे उदाहरण घालून दिले. रक्ताचा रंग एकच हा संदेश देत सर्व समाजातील तरुणांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन व बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर गावातील विविध घटकांतील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण राष्ट्राचे नेते होते. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी एकत्र येऊन एखाद्याचे प्राण वाचवण्याचा संकल्प केला, हीच त्यांना खरी मानवंदना आहे. आजच्या काळात जिथे समाजात विभागणीची दरी निर्माण होताना दिसते, तिथे पाली येथील या उपक्रमाने एकतेचा आणि मानवतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. रक्ताला ना जात असते, ना धर्म ही भावना या शिबिरातून प्रभावीपणे अधोरेखित झाली. या उपक्रमामुळे पाली परिसरात उत्साहाचे आणि ऐक्याचे वातावरण निर्माण झाले असून, समाजमाध्यमांवरही या प्रेरणादायी उपक्रमाची जोरदार चर्चा रंगत आहे.

COMMENTS