Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम पब्लिक स्कुलमध्ये प्रवेश प्रक्रिया संपन्न

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी  (दि.१४) इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांची प्रवेश प्रक्रिया

चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ; ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली; प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ
ग्रामपंचायत पोट निवडणुकीत काळे गटाचे वर्चस्व
डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे

कोपरगाव : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी  (दि.१४) इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांची प्रवेश प्रक्रिया पार पडली. 

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या एकदिवसीय प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते. गौतम पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना स्कूलने नियोजित केलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. केवळ पात्र विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जातो. ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच निकाल जाहीर करण्यात येवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे प्रवेश तात्काळ निश्चित करण्यात आले.

प्रवेश निश्चितीनंतर शाळा प्रशासनाकडून नूतन विद्यार्थी आणि पालकांसाठी एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य नूर शेख म्हणाले की, गौतम पब्लिक स्कूल ही राज्यातील दुर्मिळ शाळा आहे जिथे कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. केवळ गुणवत्तेच्या जोरावर पालक स्वतःहून आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात. प्रवेश निश्चित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेचे चेअरमन माजी आ. अशोकराव काळे, विश्वस्त आ. काळे,सचिव चैताली काळे यांनी अभिनंदन केले.  

COMMENTS