Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस बंदोबस्तात तोडणार सिध्देश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्शन

सोलापूर / प्रतिनिधी : श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याने को-जनरेशनची चिमणी उभारताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नव्हती. त्य

वारणा डाव्या कालव्यासाठी गेलेल्या जमिनीचा बागायतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी
माहिती व जनसंपर्कच्या पुणे विभागीय प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशपातळीवरील 4 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

सोलापूर / प्रतिनिधी : श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याने को-जनरेशनची चिमणी उभारताना प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण विभागाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी कारखान्याला 96 तासांची मुदत देत कारखाना बंद करण्याचे पत्र पाठविले. दुसरीकडे, महावितरण व जलसंपदा विभागालाही पत्र पाठवून 96 तासांची मुदत देऊन पाणी व वीज बंद करण्याचे आदेश दिले. त्याची मुदत आज (शनिवारी) संपणार आहे. जलसंपदा विभागाने पाणी बंद केल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनीही कारखान्यावर जाऊन कनेक्शन तोडण्याच्या दृष्टीने पाहणी केली आहे. दुपारी चार वाजता वीज कनेक्शन तोडले जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांनी दिली होती.
कारखान्याचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे. महापालिकेने सुरू केलेल्या चिमणी पाडकामाची कार्यवाही थांबवावी, यासाठी कारखान्याने 30 ऑक्टोंबर तर नोव्हेंबर महिन्यात दुसरी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. दोन्ही याचिका वेगवेगळ्या न्यायमूर्तींकडे असल्याने त्या एकत्रित करून त्यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी कारखान्याच्या वकिलांनी केली होती. त्यावेळी महापालिकेच्या वकिलांनीही चिमणी पाडण्याकामासाठी किमान दोन आठवड्यांची वेळ लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होईल. तत्पूर्वी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीनंतर नवा पेच कारखान्यासमोर निर्माण झाला आहे. चिमणी पाडण्याच्या कामापूर्वी ती थंड होऊ द्यावी लागणार आहे. तसेच को-जनरेशनची चिमणी उभारताना पर्यावरण विभागाची परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवून कारखान्याचे वीज कनेक्शन व पाणी बंद करण्याची कारवाई केली जात आहे. वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करताना महावितरणने पोलीस बंदोबस्त मागविला आहे. आता 4 वाजता महावितरण वीज कनेक्शन तोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS