Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खरात प्रकरणात दमानियांचा पोलिस आयजींवर गंभीर आरोप

मुंबई : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिकच गंभीर रूप धारण केले असून, या प्रकरणाी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका व्

प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स
आय-पॅकचे संचालक विनेश चंडेल यांना जामीन
पंजाबमध्ये आप मंत्र्याला ईडीने केले अटक;उद्योगमंत्री संजीव अरोरा प चौकशीच्या भोवर्‍यात

मुंबई : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिकच गंभीर रूप धारण केले असून, या प्रकरणाी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एका व्हिडिओद्वारे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. संबंधित व्हिडिओमध्ये ते अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतक्या उच्च पदावरील अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात सहभागी होणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अशा उपस्थितीमुळे सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
दमानिया यांनी पुढे आणखी आरोप करत सांगितले की, संबंधित अधिकार्‍यांच्या दूरध्वनी संपर्क नोंदींमध्येही संशयास्पद बाबी असल्याचे दिसून येते. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशोक खरात यांच्याशी संबंधित अनेक संपर्क आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी विभागीय दक्षता यंत्रणेमार्फत व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, राज्याच्या पोलिस महासंचालकांनी स्वतः हस्तक्षेप करून जबाबदारी निश्‍चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात यापूर्वीही अनेक धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे विविध स्तरांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. याच पार्श्‍वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयानेही कठोर कारवाई केली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातून मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, अशोक खरात यांच्या बँक खात्यातील सुमारे अडीच कोटी रुपये गोठवण्यात आले आहेत. याशिवाय एक महागडी आलिशान मोटारही जप्त करण्यात आली आहे. एकूणच, या प्रकरणात दिवसेंदिवस नवे तपशील समोर येत असून, प्रशासन, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील विविध संबंध उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी अधिक पारदर्शक व सखोल पद्धतीने होण्याची गरज अधोरेखित होत आहे.

COMMENTS