बीड तालुक्यातील नाळवंडी येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. 10 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने नाळवंडी बस स्थानक परिसरात क्र

बीड तालुक्यातील नाळवंडी येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. 10 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने नाळवंडी बस स्थानक परिसरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ‘महात्मा फुले चौक’ उभारला आहे. यासोबतच महात्मा फुले बस स्थानक परिसर असा आशय असलेला इलेक्ट्रॉनिक फलकही उभारण्यात आला आहे.
या घटनेनंतर 11 एप्रिल रोजी ग्रामस्थांनी नव्याने उभारलेल्या चौकात एकत्र येत क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी ध्वजारोहण करून सामाजिक अभिमान व्यक्त करण्यात आला. दरम्यान, हा चौक उभारल्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, हा उपक्रम गावाच्या ओळखीला नवे वळण देणारा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली असून, अज्ञात व्यक्तीने केलेल्या या कार्याचे विविध स्तरांवर कौतुकही होत आहे.

COMMENTS