Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर छापे

सहायक निबंधकांनी घेतली संशयास्पद कागदपत्रे ताब्यात

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील अवैध सावकारकी करणार्‍या सावकाराच्या घरावर राहुरीच्या सहाय्यक निबंधक अधिकार्‍याच्या

अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
कृष्णा काळेंची नौसेनेत सबलेफ्टनंट पदावर निवड
दिगंबरा..दिगंबरा श्रीपाद वल्लभ..दिगंबरा..चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी करत देवगड दत्त मंदिर भाविकांसाठी खुले

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील अवैध सावकारकी करणार्‍या सावकाराच्या घरावर राहुरीच्या सहाय्यक निबंधक अधिकार्‍याच्या पथकाने आज छापा मारत अनेक दस्ताऐवज व काही संशयास्पद कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सहाय्यक निबंधक अधिकारी दिपक नागरगोजे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेणे टाळले आहे.
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सावकाराच्या घरावर छापा मारत काही धनादेश व दस्तावेज जप्त करत सहाय्यक सहकार निबंधक अधिकार्‍यांनी याबाबत राहुरी पोलीसांत गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई थंड होते नाही तोच पुन्हा राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील अवैध सावकारकी करणारे गणपत अंबादास पेरणे या सावकाराच्या घरावर अचानक आज (दि. 16 मे) सकाळी साडेअकरा ते बारा वाजे दरम्यान सहायक निबंधक अधिकारी दिपक नागरगोजे यांच्यासह सात ते आठ जणांच्या फौज फाट्याने धाड टाकत पेरणे याच्या घरी काही दस्तावेज व कागदपत्रे व डायर्‍या जप्त केल्या असल्याचे बोलले जात आहे.या सावकारा विरोधात लेखी तक्रार दाखल झाली आहे. राहुरी तालुक्यात सावकारांनी चांगलेच वर डोके काढले आहे. सावकारकीच्या माध्यमातून अनेक शेतकरी, तरुण, छोटे-मोठे व्यावसायिक देशधोडीला लागले आहेत. मात्र या नंगटप्रवृत्तीचे सावकाराच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करत नाही. मात्र, गेल्या तीन महिन्यापूर्वी तांदूळवाडी येथील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाने तांदुळवाडी येथील गणपत पेरणे या सावकाराच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. या अनुषंगाने सहायक निबंधक अधिकार्‍यांच्या पथकाने पेरणे यांच्या घरी धाड टाकली  आहे. तिन महिन्यापूर्वी सहाय्यक निबंधक अधिकारी यांच्याकडे सावकार गणपत पेरणी याची तक्रार केली असतांना याबाबत कारवाई करण्यासाठी इतका कालावधी का लागला? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. तसेच सदर सावकार असलेल्या पेरणे यास खबर लागली होती. सहाय्यक निबंधक अधिकारी यांनी ताब्यात घेतलेले दस्तावेज व काही वह्या खरोखर संशयास्पद आहेत का? याबाबत वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. गणपत पेरणे यांच्यावर काय कारवाई होणार? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. तांदूळवाडी भागामध्ये अजूनही काही सावकार मोठ्या प्रमाणात सावकारकी करत असून त्यांनीही व्याजापोटी कोट्यावधी रुपये लावले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

व्याजाने पैसे देणारा ’तो’ मास्तर कोण ? – तळवाडी परिसरातील एक मास्तर अनेकांना मोठ्या प्रमाणात व्याजाने रक्कम देत आहे. त्याने तब्बल दोन ते तीन कोटी रुपये तालुक्यातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना दिल्याचे बोलले जात आहे. ’तो’ मास्तर कोण ? ’या’ मास्तराने एका छोट्या व्यावसायिकाला ञास दिला असल्याने ’त्या’ मास्तरा विरोधातही तक्रार दाखल करणार  असल्याचे समजले आहे.

COMMENTS