Homeताज्या बातम्याअहमदनगर

साई मंदिराच्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रम : चायल

 बेलापूर   : श्रीरामपूर–बेलापूर रोडवरील श्री साईबाबा मंदिराच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई पावन प्रतिष्ठान व साई सेवा समिती, बेलापूर तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी ग्रामीण महाविद्यालय (पीएमटी लोणी) यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कैलास चायल यांनी दिली. या वर्धापनदिनानिमित्त बुधवार (दि. १५ एप्रिल) रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मोफत दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दंत तपासणी, एक्स-रे, दात स्वच्छता, दातांची कवळी बसवणे, दात काढणे, रूट कॅनल तसेच दातांमध्ये सिमेंट व चांदी भरणे आदी सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.तसेच सकाळी १० वाजता सामूहिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी नावनोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष कैलास चायल, सचिव राजेंद्र लखोटिया, सहसचिव रामबिलास झंवर, उपाध्यक्ष दीपक सिकची, संजय लड्डा, प्रशांत बिहानी, ऍड. व्ही. एम. मालपाणी, प्रमोद कर्डिले, रमेश पवार, शशिकांत कापसे, गंगाधर पवार, सयाजी कान्हे आदींनी केले आहे. 

बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
नागसेन बुद्धविहारात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

COMMENTS