Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीमध्ये 12 व 13 एप्रिलला मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी विशेष कॅम्प; नागरिकांनी सहभाग नोंदवावा – आवाहन

परळी वै. : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या निर्देशानुसार शहरात येत्या 12 व 13 एप्रिल रोजी मतदार याद्यांच्या पुन

निवडणूक आयोगाने नागरिकांच्या जिविताशी खेळू नये!
ममता बॅनर्जींचा भवानीपुरमधून उमेदवारी अर्ज दाखल; भाजपचेे सुवेंदू अधिकारी यांच्याविरुद्ध थेट सामना
विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी !

परळी वै. :
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या निर्देशानुसार शहरात येत्या 12 व 13 एप्रिल रोजी मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. शहरातील भाजपचे सर्व बुथ प्रमुख प्रशासनाने नेमलेल्या बीएलओला यासाठी सहकार्य करणार असून प्रत्येक मतदारांनी स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नावाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (डखठ) महाराष्ट्र राज्यात सुरुवात करण्याची घोषणा भारत निवडणूक आयोग करणार आहे. त्याअनुषंगाने दिनांक 30.10.2024 रोजी अस्तित्त्वात असलेली विधानसभा मतदार संघाची यादीवरुन सन 2005 च्या मतदार यादीमधील मतदारांची मॅपींग करणे, अस्पष्ट फोटो (इङणठ झकजढज), मतदारांचे नवीन रंगीत फोटो गोळा करणे अदयावत करणे तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत व डीएससी च्या नोटीसची पडताळणी करुन त्यावर योग्य ती कार्यवाही करणे आदी कामे विहित मुदतीत पार पाडण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. परळी विधानसभा मतदार संघाअंतर्गत परळी तालुक्यातील 258 मतदान केंद्र प्रस्तावित असून सदर मतदान केंद्रासाठी केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामकाज पूर्ण करण्यारीता दिनांक 12 व 13 रोजी विशेष मतदार मॅपींग कॅम्प चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व मतदान केंद्रावर सकाळी 10 ते  सायं.5 या वेळेत सर्व बीएलओ मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. तरी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केंद्रावर जावून आपापले मतदार मॅपींग, अस्पष्ट फोटो जमा करणे, व दुबार नावे, मयत व स्थलांतरीत नावे वगळणे इत्यादी कामे करून घ्यावीत. भाजपचे बुथ प्रमुख व पदाधिकारी प्रशासनाच्या मदत करणार असून मतदारांनी संबंधित बुथ प्रमुखांना अथवा भाजपच्या पदाधिकार्‍यांना संपर्क करावा असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाने केले आहे.

COMMENTS