Homeअहमदनगरमुंबई - ठाणे

छत्तीसगडमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू

रायपूर : छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जख

‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणालीअधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी
मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये


रायपूर : छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
कांकेर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाथिया नवागाव परिसरात हा अपघात घडला. रात्री सुमारे अकराच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहने वेगात असल्याने धडकेची तीव्रता अत्यंत मोठी होती. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे अक्षरशः तुकडे झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. हे सर्वजण कांकेर जिल्ह्यातील उडकुडा गावचे रहिवासी असून ते चीवरांज येथे लग्नसमारंभ आटोपून परत येत होते. आनंदाच्या प्रसंगानंतर परतीच्या प्रवासात घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबावर काळाचा घाला ओढवला. दुसर्‍या वाहनातील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सतत वैद्यकीय देखरेख ठेवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस प्रशासनाने अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. वाहनांचा वेग, रस्त्याची स्थिती तसेच चालकांचे नियंत्रण सुटणे या बाबींचा सखोल तपास केला जात आहे. मृतांची ओळख पटविण्याचे आणि त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे कामही सुरू आहे. मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्ते सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

COMMENTS