Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओढे-नाले साफसफाईची महापालिकेकडून निव्वळ धुळफेक

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील ओढे-नाले साफसफाई सुरू केल्याचा दावा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केला असला तरी, नेमक्या कोणत्या ओढ्या-नाल्य

“उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बीएमसीकडून दीड लाख अधिकृत फेरीवाल्यांवर बंदी..
नगरपरिषदेचा ’काविळ’ की दुटप्पी न्याय?;अतिक्रमणांना अभय, मालकी हक्काच्या जागेला मात्र ’नोटीस’चा फास!
आसाराम आश्रम पाडण्याचा मार्ग मोकळा

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील ओढे-नाले साफसफाई सुरू केल्याचा दावा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केला असला तरी, नेमक्या कोणत्या ओढ्या-नाल्यांची साफ-सफाई करणे प्रस्तावित आहे, त्यासोबतच किती ओढ्या-नाल्यांमध्ये जेसीबी मशीन उतरू शकते, याची देखील त्यांनी माहिती देण्याची गरज आहे. गेल्या वर्षींप्रमाणे ओढ्या-नाल्यांचे सोपस्कार पार पाडू नये, त्याऐवजी त्या ओढ्या नाल्यांवर झालेली अतिक्रमणे आधी काढूनच त्या ओढ्या-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह उघडणे गरजेचे आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही वर्षांपासून शहरातील 41 ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणासंदर्भात दैनिक लोकमंथनसह सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडिया सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून निव्वळ धुळफेक करत मूळप्रश्‍नाला बगल दिल्याचे दिसून येत आहे. शहरात किती ओढे-नाले आहे, त्याची काय अवस्था आहे, याची संयुक्त पाहणी करण्यासंदर्भात चंगेडिया सातत्याने पाठपुरावा करतांना दिसून येत आहे. मात्र तरीही आयुक्तांकडून त्यांना दाद दिली जात नसल्याचा आरोप चंंगेडिया यांनी दैनिक लोकमंथनशी बोलतांना केला आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात आपत्ती व्यवस्थापनाचा विषय म्हणून अनेक बैठका झाल्यात, जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे निर्देश देखील दिले, तरीही कारवाई शून्य. शहरातील ओढ्या-नाल्यांवर अनेक इमारतीचे बांधकाम झाले असून त्याची परवानगी खुद्द महानगरपालिकेच्या नगररचना विभागानेच दिल्या आहेत. त्यामुळे शहरातील ओढ्या-नाल्यांची संख्या महापालिकेकडून सातत्याने बदलत आहे. गेल्याचवर्षी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते, जनजीवन विस्कळीत झाले होते, त्याची दखल घेऊन यंदातरी महापालिकेने 41 ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण काढून साफसफाई करणे गरजेचे आहे.

ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमण काढल्याशिवाय शांत बसणार नाही
अहिल्यानगर शहरातील 41 ओढ्या-नाल्यांवर अतिक्रमण झाले आहेत, त्या ओढ्या-नाल्यांमध्ये पाईपटाकून त्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवले आहेत. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस झाल्यास अर्धे शहर पाण्याखाली जाईल, त्यामुळे या ओढ्या-नाल्यातील अतिक्रमण काढून साफ-सफाई होणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तक्रारदाराला सोबत घेऊन महापालिकेने संयुक्त पाहणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चंगेडिया यांनी केली असून, जोपर्यंत अतिक्रमण काढत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

COMMENTS