संगमनेर : खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमधून देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. देशात सध्या जातीपातीचे आणि भेदभावाचे र

संगमनेर : खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमधून देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून घेतल्या. देशात सध्या जातीपातीचे आणि भेदभावाचे राजकारण सुरू आहे. हे देशासाठी धोकादायक असून या विरुद्ध सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस लढत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आगामी काळात अधिक सक्षम होणार असून काँग्रेस पक्षामध्ये तरुणांना मोठी संधी आहे. पक्षाने सुरू केलेले संघटन सृजन अभियान हे सर्व जाती धर्म , युवक नागरिक महिला या सर्वांना सोबत घेणारे असल्याचे प्रतिपादन झारखंड राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे तालुका काँग्रेसच्या वतीने आयोजित संघटन सृजन अभियान कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर ओडिसाचे माजी मंत्री सरत राऊत, लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव श्रीकृष्ण सांगळे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, दुर्गाताई तांबे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले की महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचा शाश्वत विचार असलेली काँग्रेसची विचारधारा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांनी अधिक सक्रिय झाले पाहिजे. काँग्रेस मधील कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून देशांमध्ये सुरू असलेल्या एकाधिकारशाहीला रोखण्यासाठी अधिक सक्रियतेने काम करावे.
तर ओडिसाचे माजी मंत्री सरत राऊत म्हणाले की, उत्तर आणि दक्षिणेचा संगम हा संगमनेर मध्ये झाला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सहकार शिक्षण आणि ग्रामीण विकास हा देशाला दिशादर्शक ठरणारा आहे. हा तालुका काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला असून आपल्याला पुन्हा काँग्रेसचा विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून संगमनेर ची ताकद राज्याला दाखवून द्यायचे असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS