Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रांजणगाव रोड येथे हनुमान जयंती उत्साहात

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव रोड येथील श्री हनुमान मंदिर परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, अमृतानुभव पारायण, किर्तन सोहळा व सहभोजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिराच्या कार्यक्षेत्रात साडेतीन दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान अमृतानुभव पारायण तसेच नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत किर्तन सोहळाही पार पडला. या सोहळ्यात ह.भ.प. मच्छिंद्र महाराज पवार, ह.भ.प. गणेश महाराज पाठक, ह.भ.प. संपत महाराज जवक यांनी किर्तनरूपी सेवा दिली. तर समारोप प्रसंगी ह.भ.प. अमृत महाराज शिंदे यांनी काल्याचे किर्तन सादर करत सप्ताह व हनुमान जयंती सोहळ्याची सांगता केली. या कार्यक्रमाचे आयोजन रांजणगाव रोड येथील एस. पी. ग्रुप तसेच ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने करण्यात आले होते. सहभोजनाच्या कार्यक्रमालाही भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी ढोकरीकर
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी  
कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात

सुपा : पारनेर तालुक्यातील रांजणगाव रोड येथील श्री हनुमान मंदिर परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, अमृतानुभव पारायण, किर्तन सोहळा व सहभोजनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

मंदिराच्या कार्यक्षेत्रात साडेतीन दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान अमृतानुभव पारायण तसेच नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीत किर्तन सोहळाही पार पडला.

या सोहळ्यात ह.भ.प. मच्छिंद्र महाराज पवार, ह.भ.प. गणेश महाराज पाठक, ह.भ.प. संपत महाराज जवक यांनी किर्तनरूपी सेवा दिली. तर समारोप प्रसंगी ह.भ.प. अमृत महाराज शिंदे यांनी काल्याचे किर्तन सादर करत सप्ताह व हनुमान जयंती सोहळ्याची सांगता केली.

या कार्यक्रमाचे आयोजन रांजणगाव रोड येथील एस. पी. ग्रुप तसेच ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने करण्यात आले होते. सहभोजनाच्या कार्यक्रमालाही भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला.

COMMENTS