Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू ऋषीकेश वैद्य महिला अत्याचारप्रकरणी अटकेत

पुणे : अंगात दैवी शक्तीचा संचार झाल्याचा खोटा दावा करून एका महिलेचा विश्‍वास संपादन करत तिच्यावर अत्याचार करणार्‍या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे

सूरतसारखी गॅसटंचाई मुंबई-पुण्यात होऊ नये ?रोहिणी खडसे यांचा राज्य सरकारला इशारा
पुण्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यातून दिलासा, तापमानात घट
पुण्यात आठवीतल्या मुलाचा लैगिंक छळ

पुणे : अंगात दैवी शक्तीचा संचार झाल्याचा खोटा दावा करून एका महिलेचा विश्‍वास संपादन करत तिच्यावर अत्याचार करणार्‍या भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांनी पिंपरी परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या आडून सुरू असलेल्या फसवणूक आणि अत्याचाराच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय पीडित महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. समाज माध्यमांच्या माध्यमातून ऑक्टोबर 2023 मध्ये तिची आरोपीशी ओळख झाली. धार्मिक विधी आणि व्रतवैकल्यांमध्ये रुची असल्याचे लक्षात घेऊन आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. माझ्यात दैवी शक्ती आहे, तुला ईश्‍वरभक्तीचे गुपित शिकवतो, असे सांगत त्याने महिलेचा विश्‍वास जिंकला. यानंतर आरोपी पुण्यात आला आणि मांजरी परिसरात महिलेची भेट घेतली. तिथे त्याने गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतक्यावरच न थांबता, त्याने महिलेला वसई येथे बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मी शंकर, तू पार्वती अशी भ्रामक समजूत घालत त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. नाशिकमधील अशाच एका भोंदू प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पीडित महिलेने धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली. सुरुवातीला वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासासाठी हा गुन्हा पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष पथके तयार केली होती. तपासादरम्यान आरोपी पिंपरी परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. या कारवाईबाबत माहिती देताना पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही फसवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांबाबत पुढे येण्याचे आवाहन करत, कोणतीही व्यक्ती दैवी शक्तीच्या नावाखाली गैरवर्तन करत असेल, तर त्वरित तक्रार द्यावी, असे स्पष्ट केले आहे.

COMMENTS