पाथर्डी : तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे वासंतीक नवरात्र महोत्सवाची सांगता होमहवन कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात करण्यात आली. देवस्थानच

पाथर्डी : तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे वासंतीक नवरात्र महोत्सवाची सांगता होमहवन कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात करण्यात आली. देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, शुभम दहिफळे व ॲड. ऋतीका कराळे यांच्या हस्ते होमवहनाचा कार्यक्रम पार पडला.
नवरात्रोत्सवादरम्यान शांतीपाठ, महासंकल्प, पुण्याहवाचन, चंडी याग हवन, चौसष्ठ योगिनी, दशमहाविद्या, अष्टभैरव पूजन तसेच अभिषेकासह षोडशोपचार पूजा आणि कुमारिका पूजन आदी धार्मिक विधी पार पडले. महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमामुळे पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
वासंतीक नवरात्राला ‘चैत्र नवरात्र’ असेही संबोधले जाते. हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व महत्त्वाचे पर्व मानले जाते. या निमित्ताने देशातील सर्व देवीभक्तांना उत्तम आरोग्य, धनधान्य व सुखसमृद्धी लाभावी, असा महासंकल्प करून प्रार्थना करण्यात आली.
होमहवन कार्यक्रमास देवस्थानचे विश्वस्त ऍड. विक्रम वाडेकर, बाळूशेट लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, लता दहिफळे, योगीता दहिफळे, कावेरी लाहोटी, पूजा वाडेकर, संतोष शर्मा, प्रसाद कुलट, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे पौरोहित्य वे. नारायण देवा सुलाखे, वे. भुषणदेवा, वे. निखील सुलाखे, महेश झेंड, विशाल किडे, शुभम जोशी, सिद्धेश्वर रामदासी, विशाल सुलाखे व भगवान जोशी यांनी केले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड (किवळे) येथील उद्योजक व देवीभक्त चंद्रशेखर कातळे व नगरसेविका रेश्मा बापूजी कातळे परिवाराच्या वतीने मोहटे येथील रेणुका विद्यालयातील विद्यार्थिनींना वस्त्रदान, कुमारिका पूजन व अन्नदान करण्यात आले.

COMMENTS