Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जादूटोण्याच्या सावटाखाली मध्यरात्रीचा थरार!; देवळाली प्रवरात जावयाकडून सासऱ्याच्या घरासमोर पूजा; जीव घेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा ते  श्रीरामपूर रस्त्यालगत असलेल्या पठारे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे

‘मुनोत महिला गौरव पुरस्कार’ सोहळा उत्साहात; विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महिलांचा सन्मान
आ. काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात
समता जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गायकवाड

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा ते  श्रीरामपूर रस्त्यालगत असलेल्या पठारे वस्तीवर गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जादूटोण्याच्या संशयातून जावयाने सासऱ्याच्या घरासमोर अघोरी स्वरूपाची पूजा करत कुऱ्हाडीच्या साहाय्याने जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा येथील पठारे वस्तीवर राहणारे गोविंद गंगाधर पठारे यांच्या घरासमोर रात्री साधारण एक वाजल्यानंतर संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसून आले. घराबाहेर टाचण्या टोचलेले लिंबू, काळी बाहुली, हळद-कुंकू, गलोर, दोरी आणि कुऱ्हाड अशा वस्तूंसह पूजा सुरू असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.

गेटचा आवाज झाल्याने घरातील सदस्य जागे झाले. बाहेर पाहिले असता चार जण संशयास्पद विधी करत असल्याचे दिसले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कुटुंबीय घाबरले; मात्र धाडस दाखवत त्यांनी पाठलाग करून चौघांपैकी एकाला पकडण्यात यश मिळवले. संबंधित व्यक्तीस राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

कौटुंबिक वादातून निर्माण झाला तणाव?

गोविंद पठारे यांनी सांगितले की, पकडलेला आरोपी विशाल रावसाहेब लांडगे (रा. देहरे) हा त्यांचा जावई असून, त्यांच्या मुलीचा विवाह त्याच्याशी झाला होता. मुलगी झाल्यानंतर मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप करत त्या प्रकरणी पूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना जामीन मिळाल्यापासून सतत त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.पठारे यांच्या मते, मध्यरात्री झालेल्या घटनेत जादूटोण्याबरोबरच कुऱ्हाड आणून जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र कुटुंब सतर्क झाल्याने मोठा अनर्थ टळला.

पोलिसांची कारवाई चर्चेत?

या प्रकरणी राहुरी पोलिसांनी चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविल्याची माहिती आहे. मात्र, गंभीर स्वरूपाच्या घटनेनंतरही कठोर कलमे लावण्यात आली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत संबंधितांवर कडक गुन्हे दाखल करण्याची मागणी गोविंद पठारे यांनी केली आहे.

परिसरात चर्चांना उधाण

मध्यरात्री जादूटोण्यासारखा विधी, कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी आणि जीवघेण्या हल्ल्याचा आरोप,  या सर्व घटनांमुळे पठारे वस्ती व देवळाली प्रवरा परिसरात भीती आणि चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS