लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात

मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया

संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 15 टक्क्यांनी वाढ
बेमोसमी अवकळा!
पारनेरमध्ये वादळ अन् गारपिटीने जनजीवन विस्कळीत; पत्रे उडाले; गोठ्यांची पडझड; गारांनी झोडपले; शेतीचे नुकसान

मुंबई : राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. फेब्रुवारी महिन्याचा निधी कधी मिळणार, याबाबत लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. त्यानुसार आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्रत्यक्ष निधी हस्तांतरणाला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये ही रक्कम लवकरच जमा होईल. लाभार्थींनी आपल्या बँक खात्यांची नियमित पडताळणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. महायुती सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबविण्याचा सरकारचा निर्धार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS