Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार्यकारी अभियंता दिघावकर, उपअभियंता जाधव, बापटांचा कोट्याचधींचा भ्रष्टाचार

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता बांधकाम मंडळ चेंबूर याठिकाणावरून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराने उंच टोक गाठले असून बहुमजली इमारत

लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच खात्यात; राज्य सरकारकडून निधी मंजूर, प्रक्रिया अंतिम टप्प्यात
कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांवर उपाययोजना करावी : मुख्यमंत्री फडणवीस; सचिव स्तरीय समितीने कांदा प्रश्‍नी दीर्घकालीन पर्यायांची अंमलबजावणी
खरातच्या ईशान्येश्‍वर मंदिराचा विकास शासकीय निधीतून; माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गंभीर आरोप
The current image has no alternative text. The file name is: images-19.jpg

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता बांधकाम मंडळ चेंबूर याठिकाणावरून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराने उंच टोक गाठले असून बहुमजली इमारती बांधकाम विभाग चेंबूर या विभागाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या कार्यकारी अभियंता श्रीमती दिघावकर, उप अभियंता दिलीप जाधव, विजय बापट यांनी संगनमताने या विभागात भ्रष्टाचाराचा नवा विक्रम प्रस्थापित करत नियमबाह्य कामांचा धडाका लावला आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, श्रीमती दिघावकर यांनी नियमांनुसार निविदा प्रक्रिया न राबवता नियम प्रक्रियेला डावलून निविदा प्रक्रिया राबवत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार केला. अधीक्षक अभियंता सलीम शेख यांच्या कृपाशीवार्दामुळे श्रीमती दिघावकर आणि उप अभियंता दिलीप जाधव, विजय बापट यांनी निविदामध्ये कोणतीही कॉम्टिशन न पाळता या निविदा मॅनेज करत एकाच ठेकेदाराला दिल्या असल्याच्या तक्रारी असून, त्यातील 11 कोटीची आणि दुसरी 12 कोटींची निविदा एकाच ठेकेदाराला देण्यात आल्याची तक्रार डी. वाय. सय्यद आणि अरूण बाईट यांनी केली आहे. या विभागात नियमबााह्य कामांना प्रोत्साहन देत, कोणतेही कामं न करता बोगस निविदा काढून बोगस देयके अदा करण्याचा सपाटा सुरू असून त्यातून कोट्यावधी रूपयांची नियमबाह्य कामं दाखवण्यात येत आहे.
उप अभियंता विजय बापट यांच्याकड चेंबूर येथील आणि फिल्मसिटी गोरेगाव येथील अतिरिक्त चार्ज आहे. फिल्मसिटीतील वनखात्याशी संबंधित 9 कोटींच्या कामांचे बोगस देयके उपअभियंता विजय बापट यांनी काढले असून ते नेमके कुणाच्या घशात घातले, याची चौकशी करण्याची गरज आहे. अधीक्षक अभियंता सलीम शेख यांच्या कृपाशीर्वादामुळे कार्यकारी अभियंंता दिघावकर, उपअभियंता बापट, जाधव यांनी फिल्म सिटी गोरेगावमध्ये रस्त्यांच्या आणि रिपेअरिंगच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत आहे.स्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सेव्हिंग करून आयटम कमी दाखवून मोठ्या निधींचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. सन 2022-2023, 2023-2024, आणि 2024-2025 या वर्षांमध्ये करण्यात आलेल्या कामांमध्ये स्पेशिफेकशनप्रमाणे काम न करता शासकीय निधीची लूट चालवल्याचे दिसून येत आहे. तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये बोगस निविदा काढून कोणतेही कामे न करता बोगस देयके अदा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेख रिपेअरिंगचे केवळ 10 टक्केच कामं झाली असतांना देखील त्याचे देयके अदा करण्यात आली आहेत.


दैनिक लोकमंथन करणार जनहित याचिका
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता बांधकामम मंडळ चेंबूर, फिल्मसिटी गोरेगाव याठिकाणी बोगस निविदा कार्यक्रम राबवून काम न करतांच कोट्यावधी रूपयांचा अपहार सुरू असून, याप्रकरणात दैनिक लोकमंथनच लवकरच अधीक्षक अभियंता सलीम शेख यांच्या कृपाशीवार्दामुळे श्रीमती दिघावकर आणि उप अभियंता दिलीप जाधव, विजय बापट यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करून शासकीय निधीची कशाप्रकारे लूट सुरू असल्याचे वास्तव चित्र मांडून कारवाई करण्याची मागणी करणार आहोत.


मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळकेंनी घ्यावी दखल
मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके कर्तव्यदक्ष असून, त्यांनी अधीक्षक अभियंता बांधकाम मंडळ चेंबूर या विभागातून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची दखल घेत कार्यकारी अभियंता दिघावकर, आणि उप अभियंता विजय बापट यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची, तसेच नियमबाह्य कामांचा धडाका लावल्याप्रकरणी चौकशी करून शासकीय निधीची होणारी लूट थांबवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे.


उपअभियंता संजय भेंडेंचा पॉलिटेक्निक, डीपीत प्रताप
उप अभियंता संजय भेंडे यांनी शासकीय पॉलिटेक्निक बांद्रा येथील कामांमध्ये तसेच डीपीच्या कामांमध्ये 14 कोटी तर ब-टच्या नावाखाली 8 कोटींचे बोगस देयके अदा केली असून, यासोबतच बांद्रा हायकोर्टासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेतील कामं पाडण्याचे निर्देश असतांना त्याठिकाणी केलेल्या कामासंदर्भात आणि काढलेल्या बोगस देयकासंदर्भातील सविस्तर वृत्तांत शाखा अभियंत्यांच्या नावासह उद्याच्या अंकात


उपअभियंता अनिल पन्हाड ‘ते’ दोन कांबळे कोण ?
मध्य मुंबई वरळी उपविभागाचे उपअभियंता अनिल पन्हाड यांनी आपल्या उपविभागातील वरळी पोलिसची 60 ऑफलाईन कामांपोटी बिले काढली आहे. मात्र यातील कामे झालेली असून, केलेल्या कामाचीच नवीन अंदाज पत्रके बनविले जात आहेत. यातील 10 कामे कांबळे नावाच्या कोणत्या शिपायाला दिले, त्याचे उत्तर पन्हाड यांनीच द्यावे, असे आमचे त्यांना आव्हान आहे.

COMMENTS