श्रीगोंदा : संस्था उभी करणे सोपे असते, पण ती यशस्वीपणे चालवणे कठीण असते. त्यामुळे संचालक मंडळाने पारदर्शकता आणि विश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे.सहकारात पारदर्शकता आणि विश्वास महत्वाचा असे प्रतिपादन माजी मंत्री पाचपुते यांनी केले. इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन सोहळा डॉ. आदिनाथ बाबुराव चेडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री बबनराव पाचपुते व श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते बालाजी मंदिरा शेजारी श्रीगोंदा येथे उत्साहात पार पडला. या नव्या वास्तूमुळे नागरिकांना अधिक आधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बबनराव पाचपते यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत सांगितले की, “श्रीगोंदा तालुक्यात सध्या ९ मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले शेततळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले असून, तालुक्यात ५० हजारांहून अधिक शेततळ्यांची नोंद आहे. नालाबांधणीची कामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत.” पुढे बोलताना त्यांनी पाणी व वीज या मूलभूत प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. नवीन इमारत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार असून, वाढत्या ग्राहकसंख्येला अधिक दर्जेदार सेवा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे चेअरमन एकनाथराव आळेकर यांनी सांगितले गाव चांगलं झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, या विचारानेच पुढील कामे राबवली जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, राजेंद्र म्हस्के नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, नगरसेविका दीपाली बोरुडे यांच्या सह सर्व आजी माजी संचालक कर्मचारी संसथेचे संचालक उपस्थित होते.

श्रीगोंदा : संस्था उभी करणे सोपे असते, पण ती यशस्वीपणे चालवणे कठीण असते. त्यामुळे संचालक मंडळाने पारदर्शकता आणि विश्वास टिकवून ठेवणे गरजेचे आहे.सहकारात पारदर्शकता आणि विश्वास महत्वाचा असे प्रतिपादन माजी मंत्री पाचपुते यांनी केले.
इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन सोहळा डॉ. आदिनाथ बाबुराव चेडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री बबनराव पाचपुते व श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते बालाजी मंदिरा शेजारी श्रीगोंदा येथे उत्साहात पार पडला. या नव्या वास्तूमुळे नागरिकांना अधिक आधुनिक आणि सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी बबनराव पाचपते यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देत सांगितले की, “श्रीगोंदा तालुक्यात सध्या ९ मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले शेततळे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले असून, तालुक्यात ५० हजारांहून अधिक शेततळ्यांची नोंद आहे. नालाबांधणीची कामेही मोठ्या प्रमाणात झाली आहेत.” पुढे बोलताना त्यांनी पाणी व वीज या मूलभूत प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.
नवीन इमारत अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार असून, वाढत्या ग्राहकसंख्येला अधिक दर्जेदार सेवा देण्याचा संस्थेचा मानस असल्याचे संस्थेचे चेअरमन एकनाथराव आळेकर यांनी सांगितले गाव चांगलं झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, या विचारानेच पुढील कामे राबवली जातील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, राजेंद्र म्हस्के नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, नगरसेविका दीपाली बोरुडे यांच्या सह सर्व आजी माजी संचालक कर्मचारी संसथेचे संचालक उपस्थित होते.

COMMENTS