Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिमणी संवर्धनासाठी निसर्गाचे दूत बना : उंडे

श्रीगोंदा : दैनंदिन जीवनातील धावपळ आणि चिंतेतून मुक्त होण्यासाठी निसर्गाशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाच्या सानिध्यात मन प्रसन्न होऊन नवचैतन्य प्राप्त होते, मात्र त्याचे महत्त्व आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाचा दूत बनून कार्य केले, तरच चांगले आरोग्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखता येईल, असे प्रतिपादन श्रीगोंदा सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी जगताप-उंडे यांनी केले. श्रीगोंदा तालुक्यातील सोनुबाई सखाराम महाजन शेतकी प्रशाला, मांडवगण येथे जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विभागीय वन अधिकारी अमोल जाधव, सहाय्यक वनरक्षक सोनल केसरकर तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. रसाळ होते. यावेळी वनपाल एच. टी. गारुडकर, वनरक्षक तोरडमल, डी. बी. निलाखे, एस. आर. बनसोडे, व्ही. एम. आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ या विषयाचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी ‘चिमणी संवर्धन – काळाची गरज’ या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वनपाल एच. टी. गारुडकर यांनी केले.

कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी कोयटे
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची ‘कम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन’ स्पर्धेत चमक
धरणात बुडून युवकाचा मृत्यू

श्रीगोंदा : दैनंदिन जीवनातील धावपळ आणि चिंतेतून मुक्त होण्यासाठी निसर्गाशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गाच्या सानिध्यात मन प्रसन्न होऊन नवचैतन्य प्राप्त होते, मात्र त्याचे महत्त्व आपण दुर्लक्षित करतो. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाचा दूत बनून कार्य केले, तरच चांगले आरोग्य आणि पर्यावरणाचे संतुलन राखता येईल, असे प्रतिपादन श्रीगोंदा सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी जगताप-उंडे यांनी केले.

श्रीगोंदा तालुक्यातील सोनुबाई सखाराम महाजन शेतकी प्रशाला, मांडवगण येथे जागतिक चिमणी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम विभागीय वन अधिकारी अमोल जाधव, सहाय्यक वनरक्षक सोनल केसरकर तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. रसाळ होते. यावेळी वनपाल एच. टी. गारुडकर, वनरक्षक तोरडमल, डी. बी. निलाखे, एस. आर. बनसोडे, व्ही. एम. आदी मान्यवर उपस्थित होते

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पीपीटीच्या माध्यमातून ‘चिमणी वाचवा, निसर्ग वाचवा’ या विषयाचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी ‘चिमणी संवर्धन – काळाची गरज’ या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दळवी यांनी केले, तर आभार प्रदर्शन वनपाल एच. टी. गारुडकर यांनी केले.

COMMENTS