Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकलव्य आश्रमशाळेची राज्यस्तरीय हॅकॅथॉनसाठी निवड

कोपरगाव : संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचालित टाकळी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळेने प्रकल्पस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामुळे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. लीडरशिप फॉर इक्विटी व आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर (ता. अकोले) यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथील एका रिसॉर्टमध्ये एकदिवसीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.  या स्पर्धेचा उद्देश चौथी ते आठवीतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी विकसित करणे, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे तसेच संवाद कौशल्य, तर्कशक्ती आणि ‘स्क्रॅच’ प्लॅटफॉर्मद्वारे ब्लॉक-बेस्ड कोडिंग कौशल्यांचा विकास करणे हा होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित असलेल्या २१व्या शतकातील कौशल्यांशी सुसंगत असा हा उपक्रम ठरला.  स्पर्धेत शाळेच्या संघातील श्रद्धा रामदास पवार, ओंकार संतोष पवार व रोहित भाऊसाहेब पवार (इयत्ता ८ वी) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच ‘कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स’ प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेचे शिक्षक धनेश मधुकर गायकवाड आणि मुख्याध्यापिका मीरा जोशी यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे तसेच नॉन-अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोपरगावात सुशोभीकरण कामांचे लोकार्पण; ‘नमामी गोदावरी’सह विविध नामफलकांची उभारणी
‘गुरुराज’ तर्फे सुरळीत गॅस पुरवठा : जगताप
अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होणार : माजी खा.डॉ.सुजय विखे 

कोपरगाव : संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचालित टाकळी येथील एकलव्य आदिवासी आश्रमशाळेने प्रकल्पस्तरीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. या यशामुळे ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लीडरशिप फॉर इक्विटी व आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, राजूर (ता. अकोले) यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर येथील एका रिसॉर्टमध्ये एकदिवसीय कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विविध आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

 या स्पर्धेचा उद्देश चौथी ते आठवीतील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संगणकीय विचारसरणी विकसित करणे, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे तसेच संवाद कौशल्य, तर्कशक्ती आणि ‘स्क्रॅच’ प्लॅटफॉर्मद्वारे ब्लॉक-बेस्ड कोडिंग कौशल्यांचा विकास करणे हा होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये अपेक्षित असलेल्या २१व्या शतकातील कौशल्यांशी सुसंगत असा हा उपक्रम ठरला.

 स्पर्धेत शाळेच्या संघातील श्रद्धा रामदास पवार, ओंकार संतोष पवार व रोहित भाऊसाहेब पवार (इयत्ता ८ वी) यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली. तसेच ‘कॉम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स’ प्रशिक्षण कार्यक्रमात शाळेचे शिक्षक धनेश मधुकर गायकवाड आणि मुख्याध्यापिका मीरा जोशी यांची उत्कृष्ट शिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे तसेच नॉन-अकॅडमिक डायरेक्टर डी. एन. सांगळे यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS