Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज-मांजरसुंबा महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक;पाच जण जखमी

केज : केज-मांजरसुंबा महा मार्गावरील उमरी पाटी व गंगामाऊली साखर कारखान्याजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ह

ओमायक्रॉनचा प्रसाराचे प्रमाण जास्त असल्याने काळजी घ्यावी : डॉ. भारती पवार
पश्‍चिम महाराष्ट्रातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित; 5 लाख 60 हजार ग्राहकांना पुनर्वीज जोडणी संधी
रामलल्लांच्या दर्शनासाठी सातारा-अयोध्या एसटी सज्ज; 25 नोव्हेंबरला 45 भाविक होणार रवाना

केज : केज-मांजरसुंबा महा मार्गावरील उमरी पाटी व गंगामाऊली साखर कारखान्याजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,मंगळवार दि.10 मार्च मंगळवार रोजी दुपारी सुमारे 12-00 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड रा.चिंचोली माळी हे रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणून कार्यरत असून ते त्यांचे सहकारी सिद्धेश्वर आदमाने यांच्या सह स्विफ्ट डिझायर क्र. चक-44 ड-7432 कारने बीड कडे जात होते.त्याच वेळी बीडकडून केजकडे येणार्‍या टाटा अल्ट्रॉस क्र.चक-23 इक-6566 कारची आदित्य बिअर बार समोर स्विफ्ट डिझायर कारशी समोरा समोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. या अपघातात शिवराज रविंद्र माने वय 33 रा. बीड,रवि संतराम शिंदे वय 33,रा.बीड,अनिल आत्माराम मोरे वय 32, रा.बीड,सिद्धेश्वर देवसन आदमाने वय 20 रा.बीड व मधुकर बालासाहेब गायकवाड वय 54 रा. चिंचोलीमाळी हे पाच जण जखमी झाले आहेत.सदरील अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, प्रल्हाद चव्हाण,जमादार गित्ते,संतोष गित्ते, शिवाजी कागदे व इतर कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने जखमींना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान,या प्रकरणी पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.-मांजरसुंबा महा मार्गावरील उमरी पाटी व गंगामाऊली साखर कारखान्याजवळ दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांतील एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,मंगळवार दि.10 मार्च मंगळवार रोजी दुपारी सुमारे 12-00 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड रा.चिंचोली माळी हे रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षक सुपरवायझर म्हणून कार्यरत असून ते त्यांचे सहकारी सिद्धेश्वर आदमाने यांच्या सह स्विफ्ट डिझायर क्र. चक-44 ड-7432 कारने बीड कडे जात होते.त्याच वेळी बीडकडून केजकडे येणार्‍या टाटा अल्ट्रॉस क्र.चक-23 इक-6566 कारची आदित्य बिअर बार समोर स्विफ्ट डिझायर कारशी समोरा समोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रस्त्यावर काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. या अपघातात शिवराज रविंद्र माने वय 33 रा. बीड,रवि संतराम शिंदे वय 33,रा.बीड,अनिल आत्माराम मोरे वय 32, रा.बीड,सिद्धेश्वर देवसन आदमाने वय 20 रा.बीड व मधुकर बालासाहेब गायकवाड वय 54 रा. चिंचोलीमाळी हे पाच जण जखमी झाले आहेत.सदरील अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, प्रल्हाद चव्हाण,जमादार गित्ते,संतोष गित्ते, शिवाजी कागदे व इतर कर्मचार्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक सुमित तेलंग यांच्या मदतीने जखमींना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान,या प्रकरणी पुढील तपास केज पोलीस करीत आहेत.

COMMENTS