Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला

भोजडे गावात शिबिराच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

कोपरगाव ः तालुक्यातील पूर्व भागातील भोजडे या गावी आयुर्वेदाचे डॉक्टर असल्याचा बनाव करुन दोन चारचाकी गाड्यात सुटा-बुटात डॉक्टर असल्याचे भासवून शिब

एटीएम कार्ड बदली करून 16 हजारांची फसवणूक
परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक
यूटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून नऊ लाखांचा गंडा

कोपरगाव ः तालुक्यातील पूर्व भागातील भोजडे या गावी आयुर्वेदाचे डॉक्टर असल्याचा बनाव करुन दोन चारचाकी गाड्यात सुटा-बुटात डॉक्टर असल्याचे भासवून शिबिराच्या आणि आयुर्वेदीक उपचाराच्या नावाने हजारो रुपयांना गंडा घालुन गेले असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

        एकतर पाणी पाऊस कमी दुष्काळजन्य परिस्थिती असताना शेतकरी हतबल आहे. मात्र जडलेल्या व्याधींपासून मुक्ती मिळविण्यासाठी नागरिक भांबावून जातात आणि कुणावरही भरवसा ठेऊन स्वतःची फसवणूक करुन घेतात असाच प्रकार भोजडे या गावी 1 ऑक्टोबरला घडला. या गावात एम.एच.42 के 2064 आणि एम.एच.12 एच.एल.5796 या चारचाकी वाहनातुन दोन चार ठग सुटा बुटात भोजडे गावी सकाळी दहा वाजता दाखल झाले. आमची पुण्याची संस्था असुन आम्ही आयुर्वेदीक शिबिर घेणार असून आजपासुन तुम्हाला ही औषधी दिल्यानंतर दैनंदिन विचारपूस करुन आजाराचा नायनाट होईपर्यत आम्ही इलाज करणार असून यासाठी दहा हजार रुपये फी भरावी लागेल त्या बदल्यात वातनाशक लेप देऊन या ठगांनी नागरीकांची लूटमार केली आहे.

      ठग बनुन आलेल्या या डॉक्टरने भोजडे येथील दोन भावांना एकविस हजारांना लुटले. फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. मात्र पुढे येऊन कुणी सांगण्यास तयार नाही. तपासणी आणि शिबीर फीच्या नावाने ती रक्कम फोन पे करायला लावली. 7498420255 या नंबरवर मोहन अगतराव घोडके या नावाने अकरा हजार रुपये स्वीकारले तर 7387303275 या नंबरवर किरण लहु निकम याच्या खात्यावर 9600 रुपये टाकुन घेतले. उपचारासाठी नाव नोंदणी करणारांची आधारकार्ड झेरॉक्स घेऊन त्यांनी पोबारा केला. दोन दिवस उलटल्यानंतर संपर्क झाला नाही म्हणुन संबंधितांनी त्या नंबरवर वारंवार संपर्क करुनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने आता तिन आठवडे उलटल्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे रुग्णांनी समजुन घेतले असून, आता या चारचाकी गाड्यांचे नंबर आणि ज्या फोन नंबरवर पैसे पाठवण्यात आले त्याची आरोग्य विभाग चौकशी करील का? जेणेकरुन तालुक्यात इतरांची फसवणूक टाळता येईल. याबाबत आरोग्य विभाग तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने कारवाई करील अशी नागरीकांची अपेक्षा आहे.

गुन्हे दाखल करण्याची गरज- सध्या तालुक्यात आयुर्वेदीक औषधे डॉक्टर आणि विक्रेत्यांचे पेव फुटले आहे. तर काही खाजगी इसम कमिशनवर आरोग्य सल्लागार बनुन औषधांची विक्री करुन भरमसाठ कमाई कमवत आहे. काही वजन कमी करण्यासाठी तर काही विविध आजारांवर महागडी औषधे देऊन गंडा घालुन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. याबाबत चार भिंतीच्या आत पंख्याची हवा खाणार्‍या आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेण्यापेक्षा जनजागृती करुन विना परवानगी औषधे विकणारांवर गुन्हे दाखल करण्याची सध्या गरज आहे.

COMMENTS