Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवले एलईडी स्क्रीन

अंबाजोगाई : तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणार्‍या योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक या महाव

सौ.के.एस.के. महाविद्यालयाची डिपेक्स 2026 विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट
महिला कर्मचार्‍यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत
अबब..! रवींद्र नाट्य मंदिराच्या फक्त नुतनीकरणावर 250 कोटींचा खर्च; इतका मोठा निधी कुठे आणि कसा खर्च केला, याचे उत्तर उपअभियंता अजय बापट देणार का?बापटांचा डीपीडीसीच्या 7 कोटींचे कामे विकण्याचा घाट का ?

अंबाजोगाई : तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणार्‍या योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक या महाविद्यालयातील प्रथम वर्षात शिकणार्‍या संगणक अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध प्रयोगशाळेत प्रा.निशांत मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली एलईडी स्क्रीन ची निर्मिती केली आहे. एलईडी स्क्रीन तंत्रज्ञानाच्या जलद प्रगतीमुळे विविध उद्योगांमध्ये माहिती वितरण आणि दृश्य अनुभवांसाठी उत्कृष्ट साधने उपलब्ध झाली आहेत. याच तंत्रज्ञानाच्या वापर करून एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध सूचना, अत्याधुनिक माहिती घेता येणार आहे. या स्क्रीनच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव कमलाकरराव चौसाळकर, ज्येष्ठ सल्लागार प्रा. माणिकराव लोमटे श्री रमण सोनवळकर, मेजर एस पी कुलकर्णी ,प्राचार्य रमण देशपांडे,विभागप्रमुख प्रा. रोहित कदम, प्रा.नारायण सिरसाट, प्रा.अतुल फड, प्रा.श्याम गडदे प्रा. बप्पासाहेब सोनवणे व पॉलिटेक्निक मधील सर्व शिक्षकीय कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.

COMMENTS