पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने

Homeताज्या बातम्याक्रीडा

पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने

रविवारी रंगणार महामुकाबला

पाकिस्तानने आशिया कप 2022 च्या सुपर फोरमध्ये चौथा संघ म्हणून प्रवेश केला आहे. याआधी भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, फायनलमध्ये प्रवेश
पाकिस्तानने क्रिकेट सामना जिंकल्यावर खाल्ला मार…आफगानिस्थानने धु धु धुतलं.
भारताच्या दुसर्‍या विजयाने पाकिस्तानचे धाबे दणाणले

पाकिस्तानने आशिया कप 2022 च्या सुपर फोरमध्ये चौथा संघ म्हणून प्रवेश केला आहे. याआधी भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के केले होते. पाकिस्तान सुपर फोरमध्ये पोहोचल्यानंतर आता त्यांचा भारतासोबतचा सामना ४ सप्टेंबर रोजी दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांमधील साखळी सामनाही येथे खेळला गेला, ज्यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा 5 गडी राखून पराभव करण्यात यश  मिळवले. आशिया कप 2022 च्या सुपर फोरमध्ये चार संघ पोहोचले असून आता एकूण 6 सामने खेळवले जाणार आहेत. या सहा सामन्यांनंतर गुणांच्या आधारे अव्वल स्थानावर असलेल्या दोन्ही संघांमधील अंतिम सामना ११ सप्टेंबर रोजी दुबईत खेळवला जाईल. सुपर फोरमध्ये भारताला तीन सामने खेळायचे आहेत. यामध्ये ४ सप्टेंबरला पाकिस्तानसोबत, ६ सप्टेंबरला श्रीलंकेशी, तर ८ सप्टेंबरला अफगाणिस्तान भारतासोबत खेळायचे आहे.

COMMENTS