अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य आणि तंत्रज्ञानावर भरनवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थ

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, आरोग्य आणि तंत्रज्ञानावर भर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सलग नवव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. सुमारे 85 मिनिटे चाललेल्या त्यांच्या भाषणात त्यांनी आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल न करता, तसेच नव्या घोषणा न करता, संतुलित अर्थसंकल्प सादर करत विकसित भारताच्या दिशेने एक पाऊल टाकल्याचे या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे.
पायाभूत सुविधा, आरोग्य आणि तंत्रज्ञानावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचे दिसून येत आहे. यासोबतच पायाभूत सोयी-सुविधांमध्ये देशात 7 हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर आणि 3 आयुर्वेदिक एम्स उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कर्करोगाच्या 17 औषधांवर कस्टम ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेतल्याने उपचार अधिक स्वस्त होणार आहेत. पुढील आर्थिक वर्षासाठी 12.2 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च निश्चित करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील डानकुनी येथे नवीन मालवाहतूक कॉरिडॉर, तसेच केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात दुर्मिळ खनिजांसाठी विशेष कॉरिडॉर तयार केले जातील. औषध आणि जैव-औषध क्षेत्रासाठी 10 हजार कोटींची ‘बायो-फार्मा शक्ती’ योजना, तर सेमीकंडक्टरसाठी खडच् 2.0 मिशन आणि इलेक्ट्रॉनिक्स घटकांसाठी 40 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, तर 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे. अपघात विमा करमुक्त राहणार असून, 31 जुलैपर्यंत आयकर विवरणपत्र सादर करता येणार आहे. याशिवाय मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर, 20 नवे जलमार्ग, मेडिकल टुरिझमला चालना, प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह, पर्यटन क्षेत्रासाठी 10 हजार मार्गदर्शक तयार करणे, तसेच गेमिंग व कंटेंट उद्योगाच्या वाढीवर विशेष भर देण्यात आला आहे. एकूणच, अर्थसंकल्प 2026 हा विकासाभिमुख, उद्योगपूरक आणि रोजगारनिर्मितीवर लक्ष केंद्रित करणारा असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
काय स्वस्त?
-वैद्यकीय उपकरणे
-भारतात तयार होणारी कपडे
-कर्करोग, मधुमेहावरील औषधं
-क्रीडा साहित्य
-मोबाईल फोन
-अपघात विमा
-लिथियम आयन बॅटरी
-दुचाकी
-एलसीडी, एलईडी
-सौर पॅनेल
-ईव्ही वाहने, ईव्ही बॅटरी
-फ्रोझन फूड
-सीएनजी
-बायोगॅस
-परदेशी प्रवास
-परदेशातील शिक्षण
-चामड्याच निर्यात
काय महाग?
-दारु
-खनिज
-शूज
-पीव्हीसी फ्लेक्स शीट
-सिगारेट
-भंगार
अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा
नवीन मालवाहतूक कॉरिडॉर : पश्चिम बंगालमधील डानकुनी येथे नवीन फ्रेट कॉरिडॉर उभारण्याची घोषणा.
पायाभूत सुविधांवर वाढीव खर्च : 2026-27 साठी भांडवली खर्च 12.2 लाख कोटी रुपये;
रेअर अर्थ (दुर्मिळ खनिज) कॉरिडॉर : केरळ, तामिळनाडू, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात विशेष खनिज कॉरिडॉर विकसित
वस्त्रोद्योगाला चालना : देशभरात मोठ्या प्रमाणावर टेक्सटाईल पार्क उभारण्याचा निर्णय.
बायो-फार्मा क्षेत्रात गुंतवणूक : 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘बायो-फार्मा शक्ती’ योजना; तीन नवीन संस्था स्थापन
सेमीकंडक्टर निर्मिती : भारत सेमीकंडक्टर मिशन 2.0 (आयएसएम 2.0) सुरू होणार.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनावर भर : मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स सुटे भागांसाठी तरतूद वाढवून 40 हजार कोटी रुपये.
सरकारचे लक्ष असलेली 6 प्रमुख क्षेत्रे
धोरणात्मक उत्पादन : अत्यावश्यक आणि भविष्यातील क्षेत्रांमध्ये उत्पादन क्षमता वाढवणे.
जुन्या उद्योगांचे पुनरुज्जीवन : मागे पडलेल्या औद्योगिक क्षेत्रांना नवसंजीवनी.
लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) : जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यावर भर.
पायाभूत सुविधा : रस्ते, रेल्वे, बंदरे व लॉजिस्टिक क्षेत्राचा वेगाने विस्तार.
सुरक्षा व आर्थिक स्थैर्य : दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेची हमी.
शहरांचा विकास : शहरांना व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक केंद्र म्हणून विकसित करणे.
अर्थसंकल्पाचे 3 मुख्य व्हिजन
वेग : उत्पादकता वाढवून आर्थिक विकासाला गती देणे.
क्षमता : नागरिकांचे कौशल्य आणि सहभाग वाढवून विकासात भागीदारी.
सबका साथ : प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक क्षेत्राला उत्पन्नाच्या व संधींच्या समान शक्यता.
अर्थव्यवस्थेबाबत सरकारचा आढावा
आत्मनिर्भर भारत : देशांतर्गत उत्पादन आणि ऊर्जा सुरक्षिततेमुळे आयातीवरील अवलंबित्वात घट.
मजबूत विकास दर : सुधारणांमुळे भारताचा आर्थिक विकास दर सुमारे 7 टक्क्यांवर.
12 वर्षांची स्थिरता : गेल्या 12 वर्षांत अर्थव्यवस्था स्थिर, महागाई नियंत्रणात असल्याचा दावा.
जागतिक आव्हानांमध्येही प्रगती : जागतिक व्यापार व पुरवठा साखळीतील अडचणी असूनही ‘विकसित भारत’कडे वाटचाल सुरू.

COMMENTS