Homeताज्या बातम्यादेश

आयकर स्लॅब जैसे थे

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात करदात्यांना आयकर स्लॅबच्या आघाडीवर कोणतीही सवलत मिळाली नाही. यावेळी अर्थमंत्र्यांनी आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

मार्चमध्ये जीएसटी महसूल दोन लाख कोटींच्या पुढे
विकसित भारताला दिशा देणारा अर्थसंकल्प
देशात सात हाय-स्पीड रेल्वे कॅारिडॉर उभारणार

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात करदात्यांना आयकर स्लॅबच्या आघाडीवर कोणतीही सवलत मिळाली नाही. यावेळी अर्थमंत्र्यांनी आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. याचा अर्थ असा की, पुढील बदल होईपर्यंत जुनी प्रणाली लागू राहील. सध्या, करदात्यांना जुन्या आणि नवीन दोन्ही कर प्रणालींतर्गत आयकर रिटर्न भरण्याचा पर्याय आहे. अर्थसंकल्पादरम्यान, अर्थमंत्र्यांनी आयकर कायद्याबाबत (आयटी कायदा 2025) एक मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, नवीन आयकर कायदा (आयटी कायदा 2025) 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. अर्थसंकल्पात सुधारित रिटर्न, आयटीआर-1 आणि आयटीआर-2 भरण्यासाठी अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा देखील करण्यात आली.

COMMENTS