Homeताज्या बातम्यादेश

दिल्लीतील एम्स रुग्णालयात अग्नितांडव

नवी दिल्ली/प्रतिनिधी : दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली न

16 वर्षीय नवरी, 52 वर्षांचा नवरा
डॉ. सूरज शरदराव गडाख यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित
एफआरपीची रक्कम मिळणार आता दोन टप्प्यात

नवी दिल्ली/प्रतिनिधी : दिल्लीतील एम्स रुग्णालयात भीषण आग लागली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही. या दवाखाण्यात रोज हजारो रुग्ण उपचार घेत असतात. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे आठ बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आग लागल्यावर येथील आपत्कालीन विभागातील रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. दिल्ली येथील एम्सरुग्णालयाच्या आपत्कालीन वॉर्डजवळ ही भीषण आग लागली आहे. दवाखान्यातून आगीचे आणि धुराचे लोळ भेर येत आहेत. या बाबतचे ट्विट केले आहे. ही आग 12 च्या सुमारास लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एम्सच्या एंडोस्कोपी कक्षात ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात हे देशातील मोठे रुग्णालय आहे. या ठिकाणी देशभरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. तसेच देशाबाहेरून देखील अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात. या ठिकाणी रोज साधारणत: तब्बल 12 हजार रुग्ण हे उपचार घेत असतात. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.

COMMENTS