Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणीत बिबट्याचा थरार

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नागबेंदवाडी परिसरात बिबट्याने जयवंत भिकाजी रोहोकले यांच्या शेतामधील गोठ्यात शेळीवर हल्ला केला. या हल्ल्य

स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई पुस्तकांचा सक्तीवाद?पालकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आपली पेन्शन आपल्या दारी मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार  
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन
Displaying 1001525457.jpg

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नागबेंदवाडी परिसरात बिबट्याने जयवंत भिकाजी रोहोकले यांच्या शेतामधील गोठ्यात शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

       घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अधिकारी दवणे व वनरक्षक बडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवला. यावेळी घटनास्थळी बाबाजी रोहोकले, हरी रोहोकले, कांताबाई रोहोकले आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेमुळे भाळवणी व नागबेंदवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावराची चर्चा सुरू आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी बाहेर न जाण्याचं आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

COMMENTS