Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबरला

नवी दिल्ली ः जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यासंदर्भात

खाते वाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटणार
शिर्डीत श्री रामनवमी उत्सवास मंगलमय वातावरणात सुरुवात
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला मुस्लीम समाजाची ऍलर्जी, अन्यथा लोकशाही मार्गाने इलाज करू:- सुफियान मनियार

नवी दिल्ली ः जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उपराष्ट्रपती या पदासाठी 9 सप्टेंबरला मतदान होणार असून, त्याच दिवशी निकाल देखील जाहीर होणार आहे. काँगे्रसने या पदासाठी उमेदवार देण्याचे जाहीर केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी 21 ऑगस्टसाठी नामांकन दाखल करता येणार आहे. जगदीप धनखड यांनी 21 जुलैच्या रात्री अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपकडे पुरेसे संख्याबळ असले तरी, या निवडणुकीत काँगे्रस तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे, तर भाजप पुन्हा एकदा उमेदवाराच्या बाबतीत धक्का देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धनखड यांनी 21 जुलै रोजी राजीनामा दिला होता, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 22 जुलै रोजी धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. 74 वर्षीय धनखड यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट 2017 पर्यंत होता. उपराष्ट्रपती धनखड 21 जुलै रोजी राज्यसभेच्या कामकाजाला उपस्थित राहिले. त्यानंतर, त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत संध्याकाळी राजीनामा दिला. उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांना मतदान करता येते. त्यामुळे लोकसभेत भाजपचे मित्रपक्षांच्या मदतीने बहुमत असले तरी, राज्यसभेत भाजपचे बहुमत नाही. मात्र या निवडणुकीसाठी अनेक मित्रपक्ष भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता असल्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अवघड असणार नाही. मात्र भाजप गाफील देखील राहणार नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने या पदासाठी निवडणूक मंडळ, निवडणूक अधिकारी आणि इतर आवश्यक गोष्टी अंतिम करण्यास सुरुवात केली आहे. आयोगाच्या तयारीदरम्यान, भाजप आपल्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करणार असून, मित्रपक्षांना कोणतीही संधी देणार नसल्याचे दिसून येत आहे.

भाजपकडून पर्यायी नावांचा विचार
भाजप पुन्हा एकदा धक्कातंत्र देत नव्या चेहर्‍याला या निवडणुकीसाठी संधी देवू शकते. या निवडणुकीसाठी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि सिक्कीमचे राज्यपाल ओम माथूर यांच्या नावांवर विचार करत आहे. त्याच वेळी, इंडिया अलायन्स संयुक्त उमेदवार उभा करण्याची तयारी करत आहे. एनडीएकडे बहुमत असले तरी, विरोधी पक्ष जर एकत्र आल्यास भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण होवू शकते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मतदानांसाठी एकूण मतदार 782
उपराष्ट्रपती पदासाठी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनाचे निवडणून आलेले आणि नामनिर्देशित असे दोन्ही सदस्य मतदान करतात. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे मिळून एकूण 782 सदस्य या निवडणुकीत मतदान करतील. यामध्ये लोकसभेचे 542 आणि राज्यसभेचे 240 सदस्य आहेत.

चौकट———-
394 मतांचा जादुई आकडा गाठावा लागेल
उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक येण्यासाठी निवडणूक लढणार्‍या उमेदवाराला 394 मतांचा जादुई आकडा गाठावा लागेल. भाजपचे लोकसभेत 240 खासदार असून, मित्रपक्षांचा पाठिंबा लक्षात घेता आणि राज्यसभेतील मतदारांची संख्या लक्षात घेता भाजप हा जादूई आकडा सहज गाठेल यात शंका नाही, मात्र काँगे्रससह मित्रपक्षांचे कडवे आव्हान राहू शकते.

COMMENTS