Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गझल गायक पंकज उधास यांचे निधन

मुंबई ः आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या आणि विविध गझल गाणार्‍या गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. पंकज उधास 72 वर्षांचे

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला मुस्लीम समाजाची ऍलर्जी, अन्यथा लोकशाही मार्गाने इलाज करू:- सुफियान मनियार
देशात 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजूरी | DAINIK LOKMNTHAN
मतदानाच्या दिवशी अधिकारी, कर्मचार्‍यांना भरपगारी सुट्टी

मुंबई ः आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणार्‍या आणि विविध गझल गाणार्‍या गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. पंकज उधास 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गाणी, गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. ‘चिठ्ठी आयी है..’ ही त्यांची गझल अजरामर होती, आहे आणि राहिल यात काही शंकाच नाही. ‘चांदी जैसा रंग हो तेरा सोने जैसे बाल..’ ही गझल ऐकून तर एक पिढी मोठी झाली आहे. या प्रकारचं प्रेम व्यक्त करणारी गझल असो किंवा ‘चिठ्ठी आयी है..’ सारखी विराणी असो त्यासाठी पंकज उधास हे कायमच स्मरणात राहतील.

COMMENTS