Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

उन्नावमध्ये बस अपघातात ५ जणांचा मृत्यू; १५ हून अधिक प्रवासी जखमी

उन्नाव : उन्नावमध्ये एक डबल डेकर एसी बस मंगळवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अनियंत्रित होऊन लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवर उलटली. या भीषण अपघातात पाच प्

भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत 2 तरूणींचा मृत्यू
पेरणीचे साहित्य आणायला गेले अन घात झाला!भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; चुलत भाऊ गंभीर
चंद्रपूरच्या 4 शेतमजुरांचा अपघातात मृत्यूभातलावणीसाठी जातांना वाहन उलटून अपघात, 27 जखमी
उन्नावमध्ये बस उलटून ६ ठार, १९ जखमी6 killed as bus overturns in Unnao -  Tarun Bharat Nagpur

उन्नाव : उन्नावमध्ये एक डबल डेकर एसी बस मंगळवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अनियंत्रित होऊन लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवर उलटली. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या या बसमध्ये सुमारे ३० प्रवासी होते.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस अतिशय भरधाव वेगात होती. अचानक चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकाला (डिव्हायडर) धडकून उलटली व रेलिंगवर लटकली. धडक इतकी जोरात होती की, अनेक प्रवासी बसच्या खिडक्यांमधून थेट एक्सप्रेस-वेच्या खाली कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

COMMENTS