Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये कांदा आंदोलन पेटले; मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको

नाशिक : चांदवड येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी 'क्रांती मोर्चा' काढला आहे. या अंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावर तीव

अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
शेतकऱ्यांचा कांदा मातीमोल, सरकार जाहिरातींमध्ये मश्गूलसंतप्त शेतकऱ्यांच्या भावना ; कर्जतमध्ये रास्ता रोको आंदोलन
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
Rohit Pawar Onion Protest Mumbai Agra Highway: कांद्याला २४ रुपये दर  मिळेपर्यंत लढा! रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्ग नेमका का  रोखला?

नाशिक : चांदवड येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ‘क्रांती मोर्चा’ काढला आहे. या अंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शासनाने तीन हजार रुपये दराने कांद्याची खरेदी करावी आणि विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आंदोलक कार्यकर्ते आणि नेत्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. दरम्यान, आंदोलन हिंसक वळण घेत असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी कडक पावले उचलली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

COMMENTS