Homeताज्या बातम्यादेश

हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली असून, न्यायालयाने शुक्रवारी त्यांना पाच दिवसा

अभियंत्याने मुंडन करून ऊर्जामंत्र्यांचा निषेध
उत्तर प्रदेश : आव्हानांचा स्विकार आणि…
प्री वेडिंग शूटवर घातली बंदी !

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली असून, न्यायालयाने शुक्रवारी त्यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. 31 जानेवारी रोजी हायव्होलटेज ड्राम्यानंतर सोरेन यांना ईडीने रांचीतून अटक केली होती.  ईडीच्या अटकेविरोधात हेमंत सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तर त्यांचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांना न्या. संजीव खन्ना, न्या. एमएम सुंदरेश आणि न्या. बेला एम त्रिवेदी यांच्या खंडपीठाने हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला. यापूर्वी ईडीने बुधवारी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सोरेन यांची सात तसांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती. अटकेची भीती असल्याने त्यांनी राज्यपलांशी भेटून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चाचे विधीमंडळ पक्षाचे नेते चंपई सोरेन यांनी शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांनी देखील मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या.

COMMENTS