रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार   चौकशीसाठी फडणवीसांना साकडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार चौकशीसाठी फडणवीसांना साकडे

निवेदनात म्हटले आहे की, सध्या नगर शहर व जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने मोठे हॉस्पिटल्स या ठिकाणी आहेत. शहरासह तालुक्यातील रुग्णांचा कल या मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याकडे आहे. शुक्रवार दि.9 रोजी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी वितरकांकडून रेमडेसिविर इंजेक्शन ताब्यात घेऊन ते वेगवेगळ्या हॉस्पिटलला वितरीत केले. हे वितरीत करत असताना ते कोणत्या-कोणत्या हॉस्पिटलला केले याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी माध्यमांना द्यावयास हवी होती. किंबहुना या गोष्टीचे त्यांनी नियोजन करायला पाहिजे होते. तसेच थेट हॉस्पिटलला इंजेक्शन पुरवठा न करता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनात एखादा कक्ष उभारून त्या ठिकाणी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा दवाखान्याची वा डॉक्टरची चिठ्ठी घेऊन येणार्‍या व्यक्तीला इंजेक्शन दिले असते तर ते थेट रुग्णास उपलब्ध झाले असते. मात्र तसे न करता त्यांनी इंजेक्शन हॉस्पिटलला दिल्याने मोठ्या प्रमाणात याचा काळाबाजार मांडला गेला आहे. नागरिक अजूनही या इंजेक्शनसाठी वणवण फिरत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकाराची तातडीने आपण चौकशी करावी व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा व काळाबाजार कमी होवून हे इंजेक्शन रुग्णांना कसे उपलब्ध होईल हे तातडीने पहावे, अशी मागणी यात करण्यात आली आहे. दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन गोयल यांची दिल्ली येथे भेट घेवून नगरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देवून तातडीने लक्ष घालण्याची मागणी त्यांच्याकडे केली.

व्यापारी संकुलाचे आज खा. शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन
खासगाव येथील स्मशान भुमी व गावठाण च्या जागेत बोगस नोंदी लाऊन अतिक्रमन l LokNews24
छत्रपती संभाजी महाराजांनी समाज उभारणीचे काम केले ः आ. गडाख

अहमदनगर/प्रतिनिधी – शहरात निर्माण झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा दूर करावा तसेच या इंजेक्शनचा होत असलेला काळाबाजार थांबण्यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून दोषी अधिकार्‍यांची चौकशी केली जावी, अशी मागणी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली गेली आहे. या निवेदनाची प्रत ई-मेलद्वारे त्यांना पाठवली गेली असून, त्यावर शहर भाजपचे अध्यक्ष भैय्या गंधे, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह अ‍ॅड. विवेक नाईक, सचिन पारखी, अंजली वल्लाकटी, सुरेखा विद्ये, महेश नामदे, महेश तवले, तुषार पोटे, उमेश साठे आदींचे नावे आहे.

COMMENTS