Homeताज्या बातम्यादेश

बेपत्ता हेमंत सोरेन अखेर रांचीत दाखल

दिल्लीच्या घरातून ईडीने 36 लाखाची रोकड आणि कार केली जप्त

नवी दिल्ली ः तब्बल 36 तासांपासून ठाव-ठिकाणा नसलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर मंगळवारी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ते वडील शिबू स

दूध विक्रेत्याला हॉर्न वाजवणे पडले महागात, तिघांकडून बेदम मारहाण
भाजप खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर
“अर्धवट सोडलं शूटिंग, पैसेही परत केले नाही”

नवी दिल्ली ः तब्बल 36 तासांपासून ठाव-ठिकाणा नसलेले झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अखेर मंगळवारी रांचीमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ते वडील शिबू सोरेन यांना भेटण्यासाठी मोरहाबादीला जात आहेत. सोमवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने त्यांच्या राजधानी नवी दिल्लीतील घरी छापे टाकले होते. या छाप्यात ईडीने 36 लाखांची रोकड, बीएमडब्लू कार व काही महत्त्वाची कागदपत्रं जप्त केली आहेत. जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं हेमंत सोरेन यांना दोन वेळा समन्स बजावले होते. मात्र, सोरेन यांनी त्या समन्सला केराची टोपली दाखवली. त्यानंतर ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स बजावले. मात्र, सोरेन यांनी मेल करून 31 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहू असे कळवले.
या समन्सनंतर सोरेन हे दिल्लीला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ईडीने काल त्यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकला. केंद्रीय तपास यंत्रणेचे एक पथक सोमवारी सकाळी राजधानी दिल्लीतील शांती निकेतन येथील सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचले. सुमारे 13 तास टीम तिथे थांबली. मात्र मुख्यमंत्री सोरेन तिथे नव्हते. ईडीच्या पथकाने घेतलेल्या झाडाझडतीत 36 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ’बेनामी’ नावाने नोंदणीकृत हरियाणा नंबर प्लेट असलेली बीएमडब्ल्यू कारही सापडली. याशिवाय काही महत्त्वाची कागदपत्रे सापडल्याचेही सांगण्यात आले आहे. ईडीने हेमंत सोरेन यांच्या घरात सापडलेल्या रोकड रकमेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. त्यात 500 रुपयांच्या नोटांचे अनेक बंडल दिसत आहेत. ही रक्कम 36 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे.

COMMENTS