मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे
मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये सध्या १२-५-२ असा संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला चर्चेत आहे. त्यानुसार भाजपला १२, शिवसेनेला ५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते लवकरच संयुक्त बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करतील, असे सांगितले जात आहे.
भाजपने आपल्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य जागांसाठी तयारी सुरू केली असून उमेदवार निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या कोट्यातील १२ जागांसाठी तब्बल ४८ इच्छुकांची नावे चर्चेत असल्याचे समजते. या संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

COMMENTS