Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मद्यधुंद तरूणाने केली बेस्ट बसची तोडफोड

मुंबई : कफ परेड येथे मद्यधुंद तरूणाने मंगळवारी बेस्ट बसची तोडफोड केली. तसेच बसची तोडफोड करण्यास अटकाव करणारा बसचालक आणि पोलिस शिपायाला आरोपीने मा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाचा तालुक्यात बोजवारा
माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराड पालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार
अनैतिक संबंधाच्या संशयावरून मुंडके व धड वेगवेगळे करून तरुणाचा खून | LOKNews24

मुंबई : कफ परेड येथे मद्यधुंद तरूणाने मंगळवारी बेस्ट बसची तोडफोड केली. तसेच बसची तोडफोड करण्यास अटकाव करणारा बसचालक आणि पोलिस शिपायाला आरोपीने मारहाण केली. बसची तोडफोड आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपीला कफ परेड पोलिसांनी अटक केली. यापूर्वी अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कफ परेड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई विनायक जयकर (40) परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी आसिफ हमीद शेखने आंबेडकर नगर येथून सीएसटीकडे जाणार्‍या बेस्ट बसची पुढील काच व वायपर तोडल्याचे जयकर यांच्या निदर्शनास आले. आरोपीने बस अडवल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्याला जाब विचारणारे बसचालक हेमंत कदम यांनाही आसिफने मारहाण केली. हा प्रकार पाहून जयकर तेथे गेले. त्यावेळी आरोपी त्यांच्याही अंगावर धावून गेला. तसेच आरोपीने त्यांना मारहाण केली. आरोपीने जयकर यांचा गणवेशही फाडला. या प्रकारानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी आसिफला अटक केली. यापूर्वी अंमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी आसिफला अटक करण्यात आली होती. घटनेनंतर बेस्ट कर्मचारी कदम व पोलीस शिपाई जयकर यांच्यावर जी.टी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोपीला घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

COMMENTS