औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त

Homeताज्या बातम्या

औषधावरील आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी 48 लाखांचा साठा जप्त

मुंबई : "मायफेअर क्रिम" चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहिती

लोकांनी कमी स्वयंपाक करावा म्हणून केंद्राने सिलेंडरचे भाव वाढवले (Video)
बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा; खा.बजरंग सोनवणे पोटतिडकीने बोललेपालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; 17 सप्टेंबरपूर्वी रेल्वे सुरू करण्याचा दिलेला शब्द पाळण्याचे आवाहन
दहशतवाद्यांच्या घरात सापडली बॉम्ब बनवण्याचे कागद

मुंबई : “मायफेअर क्रिम” चे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहितीपत्रकावर ‘त्वचेचा रंग उजाळते’ अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे भिवंडी येथील गोडाऊनमधून 14 लाखांचा व नागपूर येथून 34 लाखांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा.रा. गहाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 106, अनुसूचीचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याचे औषध निरीक्षक प्रशांत आस्वार व रासकर यांनी भिवंडी येथे तर नागपूर येथे औषध निरीक्षक महेश चौधरी यांनी साठा जप्त केला आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने उत्पादकांनी औषधे व जादुटोणा आदी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 व नियम 1955 आणि औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 च्या तरतुदीचे उल्लंघन करणा-या जाहिराती प्रसिध्द करु नयेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास अन्न व औषध प्रशासनास हेल्पलाईन क्रमांक 1800222365 वर संपर्क करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

COMMENTS