Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.ज्योतीताई मेटे यांना विधान परिषदेवर घ्यावे-शिवसंग्रामची मागणी

बीड प्रतिनिधी - शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते विनायकराव मेटे यांनी आपल्या हयातीत भाजप बरोबरील युती धर्म प्रामाणिकपणे पाळला. तसेच

महाराष्ट्राला हादरवणारी घटना !
रशियाचे चांद्रयान ‘लूना-25’ कोसळले
तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला ः जिल्हाधिकारी सालीमठ

बीड प्रतिनिधी – शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते विनायकराव मेटे यांनी आपल्या हयातीत भाजप बरोबरील युती धर्म प्रामाणिकपणे पाळला. तसेच वेळोवेळी पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावली. मेटे साहेबांच्या पश्चात भाजपने दिलेला शब्द पूर्ण करत त्यांच्या पत्नी डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांना राज्यपाल कोट्यातून  विधान परिषदेवर घ्यावे. या मागणीचे निवेदन काल शिवसंग्रामचे शिस्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना प्रत्यक्ष सादर केले .
लोकनेते विनायकराव मेटे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मैत्री सर्वश्रुत आहे. सन् 2014 पासून शिवसंग्राम संघटनेने मैत्री व युती धर्म प्रमाणीकपणे निभावत भाजप सोबत खंबीरपणे राहण्याची भुमीका निभावलेली आहे. प्रत्येक वेळी युती धर्म म्हणून दिलेली जबाबदारी प्रमाणिकपणे पाळलेला आहे. राज्य सरकारने अचानकपणे मराठा आरक्षण प्रश्नी लावलेल्या मिटींगला येत असतांना दुर्दैवाने अपघात होवून लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांचे निधन झाले. मेटे साहेबांनी राज्यभर विस्तारीत केलेली चळवळ व कार्यकर्ते पोरके झाले आहेत . मराठा समाजामध्ये कधी न भरुन निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. नंतरच्या काळामध्ये कुशल प्रशासक महणून कर्तव्य पार पाडत असलेल्या आदरणीय डॉ. ज्योतीताई विनायकराव मेटे या संघटनेसाठी वेळ देत असून कार्यकर्त्यांना पोरके होऊ न देता त्यांना  बळ देत आहेत. परंतु  संघटनेला पाठबळ देण्यासाठी व मराठा समाजातील निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी डॉ.ज्योतीताई विनायकराव मेटे यांना विधान परिषदेत समावेश करावा व मैत्री धर्म निभवावा अशी विनंती शिवसंग्रामच्या शिष्टमंडळाने केली आहे.याप्रसंगी बीड तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडित माने ,शिवसंग्रामचे युवा नेते ड.गणेश मोरे,ज्येष्ठ नेते बाळासाहेब खोसे,   शिवसंग्रामचे युवक तालुकाध्यक्ष गणेश साबळे,पिंपरी – चिंचवडचे शिवसंग्राम संपर्कप्रमुख पांडुरंग आवारे पा. तथा अन्य शिवसंग्रामचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

COMMENTS