मुंबई हल्ल्यानंतर कठोर कारवाई अपेक्षित होती- मनीष तिवारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई हल्ल्यानंतर कठोर कारवाई अपेक्षित होती- मनीष तिवारी

नवी दिल्ली : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती असे काँग्रेस नेते मनीष तिवार

संजय राऊतांना ईडीची नोटीस | LokNews24
नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठाण च्या वतिने बंधारे  खोलीकरन व रूंदीकरण
प्रदीर्घ सेवेनंतर पंचशील विद्यालयाचे उपमुख्याध्यापक ताडेवाड सेवानिवृत !

नवी दिल्ली : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती असे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी म्हंटले आहे.
तिवारी यांनी आपल्या पुस्तकात तसा उल्लेख केला आहे. कारवाई न करणे कमकुवतपणाचे लक्षण होते असे तिवारी यांनी पुस्तकात नमूद केलेय. काँग्रेस नेते मनीष तिवारी आपल्या पुस्तकात म्हणाले की, जेव्हा एखादा देश(पाकिस्तान) निर्दोष लोकांची कत्तल करतो आणि त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा खेद व्यक्त करत नाही. त्यावेळी संयम दाखवणे ही ताकद नसून कमकुवतपणाचे लक्षण आहे. मुंबईत 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यानंतर पोकळ शब्दांपेक्षा प्रत्युत्तर देत कारवाई करणे आवश्यक होते. तिवारी यांनी या मुंबई हल्ल्याची तुलना अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्याशी करत भारताने कठोर कारवाई करायला हवी होती, असे मत व्यक्त केले होते.

COMMENTS